Wednesday, September 2, 2026

लोकमान्य टिळकांचा विचार आजही समाजाला आदर्शवतच आहे- प्राचार्य डॉ.संजय पाटील


बिद्री; (प्रतिनिधी), भारताच्या असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी व  मराठा या वृत्तपत्रातून सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील जे विचार मांडले ते त्या काळाबरोबरच आजच्या काळात ही आदर्शवतच आहेत. त्यांनी केलेले लेखन, त्यांनी घालून दिलेले आदर्श,स्वातंत्र्या विषयीचे कार्य आजही तरुण पिढीने स्वीकारले पाहिजेत असे मत  प्राचार्य डॉ .संजय पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक जयंतीचे. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवन प्रवासा संबंधी आणि कार्याविषयी माहिती दिली. टिळकांनी सुरू केलेले वेगवेगळे सार्वजनिक उत्सव आज कोणत्या रूपाला पोहोचले आहेत याबद्दल खंत व्यक्त करून टिळकांच्या तत्कालीन उद्देशाचा विसर पडू नये अशा भावना व्यक्त केल्या. 
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ .आनंद वारके यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. श्रीकृष्ण साळोखे होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा .सौ.सुहानी पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक , प्रशासकीय कर्मचारी ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


दूधसाखर महाविद्यालयात "श्रावणधारा" भितीपत्रकाचे उद्घाटन


बिद्री , कविता ही जगण्याचे प्रतिबिंब असते .समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचे प्रतिबिंब कवी आपल्या प्रतिभेच्या साह्याने साहित्यात मांडत असतो.असेच अनुभव  महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने तयार केलेल्या "श्रावणधारा" या भितीपत्रकातील विद्यार्थ्यांच्या कवितांच्या मधून येतो  असे प्रतिपादन प्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ .संजय पाटील यांनी केले. 
प्राचार्य डॉ.पाटील पुढे  म्हणाले, कविता,कथा इ .साहित्य लिहिणे म्हणजे एक आनंदी अनुभव असतो.कविता, कथा किंवा अन्य वाङ्ममय प्रकार लिहून झाल्यानंतर लेखकाला, कवीला एक वेगळा आनंद मिळतो हा आनंद आपल्याच महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी घेतला आहे.असे सांगून त्यांनी त्यांचे अभिनंदन व  पुढील लेखन प्रवासास   हार्दिक शुभेच्छा दिल्या. 
यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी कविता लिहिल्या त्यांची प्रतिनिधी म्हणून कु.अदिती कुलकर्णी व कु अदिती फराकटे यांनी आपल्या काव्य लेखनाविषयी  अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी तर आभार प्रो .डॉ .आनंद वारके यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  अर्जुन कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.

अण्णा भाऊ साठे हे वैश्विक दर्जाचे साहित्यिक - प्रा. डॉ. आनंद वारके


बिद्री : 'वंचितांचे जीवन आपल्या साहित्यातून पहिल्यांदा साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांनी जगाला दाखवून दिले.त्यामुळे ते वैश्विक दर्जाचे साहित्यिक आहेत'असे मत प्रा.डॉ.आनंद वारके यांनी व्यक्त केले.ते येथील दूधसाखर महाविद्यालयात लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचा जन्म दिवस 'लेखन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करताना बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय पाटील होते. 
प्रा.डॉ.वारके पुढे म्हणाले,साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांनी अफाट प्रतिभा शक्तीच्या जोरावर कादंबरी,कथा,नाटक, पोवाडे,लावणीतून वंचित, शोषित, दलित यांच्या समस्या मांडून समाज परिवर्तनचा संदेश समाजाला दिला.तो आजही समाजाला उपयोगी आहे.
यावेळी लेखन प्रेरणा दिनानिमित्त कोणत्याही विषयावरील लेखन कोणत्याही साहित्य प्रकारात करावे,असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले.
यावेळी महाविद्यालतील नॅकचे सह समन्वयक डॉ.एस.ए.साळोखे, प्राध्यापक,पालक श्री.खापरे,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.स्वागत व प्रास्ताविक डॉ. प्रदीप कांबळे तर सूत्र संचालन प्रा.सुहानी पाटील यांनी केले.

Saturday, July 11, 2026

गझल जगण्याचे भान देते : डॉ. स्नेहल कुलकर्णी


बिद्री : "गझल लेखन व श्रवण जगण्याला बळ देत असते" असे मत महाराष्ट्रातील नामवंत गझलकार डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. त्या येथील दूधसाखर महाविद्यालयातील मराठी विभाग व वार्षिक अंक समितीच्यावतीने 'स्पंदन' या वार्षिक अंक प्रकाशन व 'स्नेह गझल' या संयुक्त कार्यक्रमात बोलत होत्या.अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य व वार्षिक अंकाचे 
मुख्य संपादक डॉ.संजय पाटील होते.
कुलकर्णी पुढे म्हणाल्या,अरबी,फारसी व उर्दू भाषेत असणारा गझल हा काव्य प्रकार मराठीत आणण्याचे महत्वपूर्ण कार्य सुरेश भट यांनी केले.प्रियकर व प्रेयसी यांच्या भावाविश्वाशी मर्यादित असणारी मराठी गझल आता मानवी जीवनातील सर्व विषय आपल्या कवेत घेऊ लागली आहे.त्यांनी आपल्या गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली.यावेळी नॅकचे सह समन्वयक डॉ.डी.एन.
पाटील,ग्रंथपाल अतुल नगरकर, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.
प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते 'स्पंदन' या महाविद्यालयाच्या वार्षिक अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
स्वागत,प्रास्ताविक वार्षिक अंकाचे कार्यकारी संपादक प्रा.डॉ.आनंद वारके यांनी केले.आभार डॉ.डी.एन
पाटील यांनी मानले.सूत्र संचलन प्रा.सुहानी पाटील यांनी केले.

दूधसाखर महाविद्यालयात स्नेह गजल कार्यक्रम सादर करताना डॉ.स्नेहल कुलकर्णी सोबत प्राचार्य डॉ.संजय पाटील, प्रा .अतुल नगरकर,डॉ. डी .एन.पाटील,डॉ. आनंद वारके

Thursday, March 26, 2026

संवेदनशील माणूसच कविता लिहितो:- कवी गोविंद पाटील

बिद्री,संवेदनशील मनाचाच माणूस कविता लिहू शकतो, जो प्रत्येक गोष्टीकडे भावनिक दृष्टीने पाहतो, तो आपल्या भावना अचूकपणे कवितेमध्ये मांडू शकतो, कवितेसाठी व्यवहारापेक्षा विचार महत्त्वाचा असतो. असे मत कोनवडे येथील प्रसिद्ध कवी गोविंद पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत "मराठी काव्य निर्मिती" या विषयावरील कार्यशाळेचे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे यांनी केले.त्यांनी कवितेच्या मूलभूत तत्वाची चर्चा केली व काव्य निर्मितीची प्रक्रिया समजून सांगितली.
यावेळी दुसरे वक्ते प्रा. शिवाजी देसाई यांनीही आपल्या कविता सादर करून काव्य निर्मितीचे गुपित उलगडून दाखवले. स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. आनंद वारके यांनी केले. आभार प्रा.डॉ. प्रदीप कांबळे यांनी मानले सूत्रसंचालन प्रा. सुहानी पाटील यांनी केले. कार्यक्रमाला अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ.एस.जी.खानापुरे, देवचंद कॉलेजचे प्रा.डॉ. रमेश साळुंखे, कागलचे प्रा.संदीप वाडेकर,मुरगुडचे प्रा.सोहम डाफळे ,ग्रंथपाल अतुल नगरकर,जगन्नाथ कांबळे यांच्यासह  सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, January 28, 2026

दूधसाखर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उत्साहात संपन्न

बिद्री: विश्वकोश लेखन हे अत्यंत अवघड व व्यापक स्वरूपाचे काम असले तरीसुद्धा ते अत्यंत महत्त्वाचे आहे. विश्वकोशामध्ये असलेल्या नोंदी अनेक संदर्भ तपासून शासनाच्या परवानगीनेच प्रसिद्ध केल्या जातात. त्यामुळे विश्वकोशाचा वापर करून आपल्या ज्ञानात भर घालावी व संशोधनासाठी याचा वापर करावा असे मत होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र,मुंबई चे निवृत्त शास्त्रज्ञ विजय लाळे यांनी व्यक्त केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मराठी विभाग आणि मराठी विश्वकोश मंडळ, वाई आयोजित विश्वकोश लेखन नोंद कार्यशाळेचे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय पाटील होते. 
या कार्यशाळेचे दुसरे वक्ते महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ वाई चे विद्याव्यासंगी सहाय्यक रवींद्र घोडराज यांनीही विश्वकोश लेखन कसे केले जाते, सर्वसामान्य माणूस सुद्धा या कोशासाठी कसे लेखन करू शकतो यासंबंधी माहिती दिली. विश्वकोश हा महत्त्वाचा लेखन दस्तऐवज आहे त्याचा वापर करावा अशा पद्धतीचे आवाहन यावेळी त्यांनी केले. या कार्यशाळेसाठी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र शोभणे, सचिव डॉ. रमाकांत देवरे यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी तर आभार प्रा. डॉ. आनंद वारके यांनी मानले.
सूत्रसंचालन प्रा. डॉ .प्रदीप कांबळे यांनी केले. कार्यक्रमाला प्राचार्य डॉ.शिवाजीराव होडगे यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, January 22, 2026

सातत्य व चिकाटी हेच यशाचे खरे गमक :पीएसआय तेजस्विनी पाटील

बिद्री: सातत्याने अभ्यास करून सुध्धाअपयश आले तरी ही खचून न जाता अभ्यासातील चिकाटी हेच यशाचे गमक आहे .त्यासाठी विद्यार्थ्यांनी सतत अभ्यासात राहीले पाहिजे, असे मत मांगेवाडी च्या सुकन्या आणि सद्या सांगली येथील पी.एस.आय. तेजस्विनी पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद या शिवाजी विद्यापीठ मान्यता प्राप्त कोर्सच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रकट मुलाखत कार्यक्रमाचे. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संजय पाटील होते.यावेळी पाटील यांच्या उपस्थित विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा, परीक्षेला कसे सामोरे जावे,मुलाखतीची तयारी कशी करावी यासंबंधी सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी चर्चा करताना पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत शंका निरसन केले. 
  कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक या अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी केले. तर आभार प्रा. डॉ.आनंद वारके यांनी मानले. यावेळी ग्रंथपाल अतुल नगरकर,जगन्नाथ कांबळे यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, February 27, 2025

मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे -प्राचार्य डॉ.संजय पाटील

दूधसाखर महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय पाटील

बिद्री.मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे .कारण ती फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्र बाहेर अनेक  देशामध्ये बोलली जाते. तिच्यामध्ये सर्व समावेशक अशी काही मूलतत्वे आहेत ज्यामुळे ती लोकप्रिय अशी भाषा आहे. मराठी भाषेला खूप मोठी साहित्य परंपरा आहे. ही परंपरा मराठीचे उज्वल असणे सिद्ध करते. मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखक कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कारण त्यांनी मराठी साहित्यात उत्तम असे साहित्य लेखन केलेले आहे. त्यांची साहित्य परंपरा मराठी माणसाच्या जगण्याचे समृद्ध चित्र करते. अशा या महामानवाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते महाविद्यालयात आयोजित मराठी राजभाषा गौरव दिनाचे. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन व आभार प्रा .डॉ.प्रदीप कांबळे यांनी  केले. तर उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. आनंद वारके यांनी केले. यावेळी विचार मंचावर महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एम.जी. खानापुरे उपस्थित होते.

Saturday, February 8, 2025

दूधसाखर अंकाचे प्रकाशन करताना मान्यवर




दूधसाखर महाविद्यालयाच्या पारितोषिक वितरण समारंभात मराठी विभागाने चालविलेल्या ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आलेल्या दूधसाखर या अंकाचे प्रकाशन करताना अध्यक्ष मा.आमदार के. पी. पाटील साहेब, प्रमुख पाहुणे प्रा. संभाजीराव पाटील,प्राचार्य डॉ. संजय पाटील व इतर मान्यवर

Wednesday, February 5, 2025

जगण्याच्या अस्वस्थतेतून चांगली कविता जन्म घेते : प्राचार्य डॉ. संजय पाटील

बिद्री.कवितेमुळे माणसाला जगणे सहज सोपे होते,कारण जगण्याची अस्वस्थता कवितेतून कवी मांडत असतो, महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने कविता केली पाहिजे ते त्याच्या जिवंतपणाचे लक्षण असते असे मत प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित केलेल्या काव्यसंमेलनात व्यक्त केले. यावेळी अदिती कुलकर्णी ,साक्षी पाटील,सायली चव्हाण, कोमल कुंभार, सोनल जमनिक , गौरी घारे, प्रणय पाटील, ओंकार वाडकर यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एच.डी धायगुडे प्रा.अविनाश कांबळे,प्रा. दिगंबर पाटील, प्र.किशोर पाटील, प्रा .सुनील सुतार,प्रा. सुहानी पाटील, प्रा.माया पाटील , प्रा. गौतम कांबळे यांच्या सोबत  प्रा. डॉ. आनंद वारके यांनी कविता सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ .प्रदीप कांबळे यांनी केले.




दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आयोजित केलेल्या कवी संमेलनात कविता सादर करताना अदिती कुलकर्णी सोबत प्राचार्य डॉ.संजय पाटील,डॉ. आनंद वारके, डॉ. प्रदीप कांबळे

Thursday, January 30, 2025

सातत्याने अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत यश मिळते : अभिषेक पाटील

बिद्री.अभ्यासात सातत्य ठेवले व नवीन शिकण्याचा ध्यास ठेवल्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होणे सहज शक्य आहे. कठोर मेहनत आणि कोणताही शॉर्टकट न ठेवता सर्व गोष्टींचा ,सर्व विषयांचा सर्वांगीन अभ्यास केला पाहिजे असे प्रतिपादन एमपीएससी परीक्षा पास होऊन व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय, मुंबई महाराष्ट्र राज्यअधिकार   पदावर रोहा येथे कार्यरत  असलेले अभिषेक पाटील यांनी  केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद या शिवाजी विद्यापीठ मान्यता प्राप्त कोर्सच्या वतीने आयोजित केलेल्या प्रकट मुलाखत कार्यक्रमाचे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना यश मिळवताना कसा संयम ठेवायला हवा , अभ्यासाच्या वेगवेगळ्या ट्रिक तसेच थोड्याशा यशाने हुरळून न जाता सातत्य ठेवले पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य डॉ.संजय पाटील होते. यावेळी अभिषेक पाटील यांचे वडील प्रा.आर.के.पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर प्रा.डॉ.आनंद वारके उपस्थित होते.पाहुण्यांची ओळख  प्रा.अतुल नगरकर यांनी करून दिली. कार्यक्रमाचे स्वागत ,प्रास्ताविक , सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ. प्रदीप कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी तसेच प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित स्पर्धा परीक्षेत कसे यशस्वी व्हावे याविषयी प्रकट मुलाखत देताना  अभिषेक पाटील सोबत प्राचार्य डॉ. संजय पाटील व इतर

Sunday, January 5, 2025

वाढदिवसानिमित्त दूधसाखरच्या प्राचार्यांनी दिली विद्यार्थ्यांना अनोखी भेट.

बिद्री.दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या साठी स्ट्रेचर भेट दिले. महाविद्यालयात इतरत्र फिरत असताना, खेळत असताना विद्यार्थी,विद्यार्थिनी चक्कर येऊन पडतात किंवा काही छोटे मोठे अपघात होतात. अशा विद्यार्थ्यांना विशेषता विद्यार्थिनींना लेडीज रूम पर्यंत किंवा दवाखान्यात नेण्यासाठी गाडीपर्यंत घेऊन जाणे अशक्य होते. यासाठी प्राचार्यांनी या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या स्ट्रेचरवरून सुरक्षित ठिकाणी, रूममध्ये आणण्यासाठी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून स्ट्रेचर भेट दिले. प्राचार्य डॉ. संजय पाटील हे प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाला एक वाचन कट्टा बांधून देत असतात.आत्तापर्यंत त्यांनी महाविद्यालय परिसरात सात  वाचनकट्टे बांधून दिलेले आहेत.ज्याचा वापर विद्यार्थी,विद्यार्थिनी,पालक,खेळाडू,ज्येष्ठ नागरिक करतात.तसेच अनेक सामाजिक उपक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो.  या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी महाविद्यालयाला स्ट्रेचर भेट देताना बिद्री कारखान्याचे  संचालक पंडितराव केणे, रणजीत मुडूकशिवाले,संचालिका सौ .रंजना पाटील, सौ.क्रांती पाटील  याबरोबरच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अनोख्या भेटीबद्दल  उपस्थित सर्वांनी प्राचार्य डॉ.संजय पाटील यांचेविषयी  कृतज्ञता व्यक्त केली.त्यांच्या या उपक्रमाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.




दूधसाखर महाविद्यालयात माझी साहित्यनिर्मिती या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. शिवाजी देसाई विचारमंचावर प्राचार्य डॉ. संजय पाटील नॅक समन्वयक डॉ. एस. जी. खानापुरे, ग्रंथपाल अतुल नगरकर.

साहित्य म्हणजे जीवनाचा आरसा: प्रा.शिवाजी देसाई 
बिद्री.साहित्य म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनाचा आरसा असतो.आपल्या आयुष्यात किंवा आजूबाजूच्या समाजात ज्या घटना घडतात त्या तो बघतो आणि आपल्या साहित्यात संवेदनशीलतेने वास्तवाने मांडतो. या निवडक घटना वाचकांना आवडल्या की ते साहित्य लोकप्रिय होते. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनातील निवडक साहित्याची मांडणी केली पाहिजे असे प्रतिपादन कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्रा. शिवाजी देसाई यांनी  केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित केलेल्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अंतर्गत नवोदित लेखकांशी संवाद या कार्यक्रमाचा.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी साहित्य लेखनासंबंधी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य डॉ. संजय पाटील होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना साहित्य लेखनासंबंधी मार्गदर्शन करताना साहित्याची मूलभूत तत्वे समजावून सांगितली. यावेळी विचार मंचावर ग्रंथपाल अतुल नगरकर,नॅक समन्वयक डॉ .एस.जी.खानापुरे प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमास  सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे स्वागत व       प्रास्तविक डॉ. प्रदीप कांबळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.सुहानी पाटील यांनी केले.आभार प्रा.डॉ.वैशाली कांबळे यांनी मानले.


दूधसाखर महाविद्यालयात 31 डिसेंबर रोजी दूधवाटप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी

दूध पिऊन जल्लोष करा. प्राचार्य डॉ. संजय पाटील बिद्री.सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण दूध पिऊन जल्लोषात करूया असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले. ते दूधसाखर  महाविद्यालयात 31 डिसेंबर रोजीच्या दूध वाटप्रसंगी बोलत होते. डॉ.पाटील पुढे म्हणाले, 31 डिसेंबर प्रत्येक वर्षी येतो परंतु तो आपला भारतीय सण नाही. पाश्यात्यांच्या अंधानुकरणातून आमचा आजचा तरुण व्यसनाधीन बनत आहे. आजच्या दिवसात विक्रमी मद्य विक्री होते हे भूषणावर नाही. यातून देशाची तरुण पिढी बरबाद होते आहे. शेवटी वाईट व्यसनांची बदनामी करून भारतीय संस्कृतीचे जतन करून आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी दूध प्या, निरोगी रहा आणि जल्लोष करा असे आवाहन त्यांनी केले. सुरुवातीस डॉ. आनंद  वारके यांनी आयुर्वेदिक कढिचे वाटप केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Tuesday, September 3, 2024

उपेक्षितांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी केले : प्राचार्य डॉ.संजय पाटील

 बिद्री. समाजातील उपेक्षित लोकांच्या सुखदुःखाची मांडणी करून साहित्यामध्ये वेदना, विद्रोह, नकार ,मानवता आणण्याचे काम महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यांचे साहित्य हे अजरामर आणि भारतीय पातळीवर सर्वश्रेष्ठ ठरलेले साहित्य आहे .त्यांच्या या कार्याचा मान म्हणून त्यांना भारतरत्न दिला जावा. तसेच इंग्रजांच्या विरुद्ध सक्षमपणे लेखणीची लढाई देऊन आपल्या मराठा व केसरी या दैनिकांच्या माध्यमातून लोकांना जागृत करणाऱ्या लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती च्या संयुक्त प्रतिमापूजन तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या संकलित साहित्याच्या भितीपत्रकाचे उद्घाटन कार्यक्रमाचे. डॉ.एस. ए.साळोखे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक हवलदार तसेच महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी ,सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत,प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. आनंद वारके यांनी मानले.
दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक  पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवन चरित्राची माहिती देताना प्राचार्य डॉ.संजय पाटील,उपस्थित डॉ.आनंद वारके, डॉ.प्रदीप कांबळे

लोकमान्य टिळकांचा विचार आजही समाजाला आदर्शवतच आहे- प्राचार्य डॉ.संजय पाटील

बिद्री; (प्रतिनिधी), भारताच्या असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी व  मराठा या वृत्तपत्रातून सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्ष...