दूधसाखर मध्ये माझी यशोगाथा या विषयावर बोलताना विनायक पाटील,सोबत प्राचार्य डॉ.संजय पाटील,डॉ.एस. ए.साळोखे,डॉ.प्रदीप कांबळे
बिद्री.-आपली परिस्थिती बदलायची असेल व कष्ट करण्याची जबरदस्त तयारी, अभ्यास करण्यासाठी इच्छाशक्ती असेल तर कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होणे अवघड नाही. तसेच नियोजनबद्ध अभ्यास हा आपल्याला यशापर्यंत जाण्यासाठी उपयोगी पडतो. असे मत नुकतेच उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झालेले मुदाळ येथील श्री विनायक नंदकुमार पाटील यांनी दूधसाखर महाविद्यालय, बिद्री येथे आयोजित ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद या या कोर्स अंतर्गत आयोजित केलेल्या मुलाखतीत व्यक्त केले. पाटील पुढे म्हणाले, की आजच्या काळात नोकरीसाठी भरपूर पैसे मोजावे लागत आहेत. अशावेळी कष्ट करण्याची इच्छाशक्ती तसेच चिंतन करण्याची शक्ती या गोष्टी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देऊ शकतात. या कोर्समधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनाचा आढावा प्रश्न विचारून माहित करून घेतला. यावेळी विचार मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .संजय पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.प्रदीप कांबळे यांनी व्यक्त केले. तर आभार महाविद्यालयाचे नॅक सह समन्वयक डॉ.एस. ए .साळोखे यांनी व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
No comments:
Post a Comment