बिद्री , कविता ही जगण्याचे प्रतिबिंब असते .समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचे प्रतिबिंब कवी आपल्या प्रतिभेच्या साह्याने साहित्यात मांडत असतो.असेच अनुभव महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने तयार केलेल्या "श्रावणधारा" या भितीपत्रकातील विद्यार्थ्यांच्या कवितांच्या मधून येतो असे प्रतिपादन प्राचार्य व मराठी विभाग प्रमुख डॉ .संजय पाटील यांनी केले.
प्राचार्य डॉ.पाटील पुढे म्हणाले, कविता,कथा इ .साहित्य लिहिणे म्हणजे एक आनंदी अनुभव असतो.कविता, कथा किंवा अन्य वाङ्ममय प्रकार लिहून झाल्यानंतर लेखकाला, कवीला एक वेगळा आनंद मिळतो हा आनंद आपल्याच महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी घेतला आहे.असे सांगून त्यांनी त्यांचे अभिनंदन व पुढील लेखन प्रवासास हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी कविता लिहिल्या त्यांची प्रतिनिधी म्हणून कु.अदिती कुलकर्णी व कु अदिती फराकटे यांनी आपल्या काव्य लेखनाविषयी अनुभव सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तसेच स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी तर आभार प्रो .डॉ .आनंद वारके यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अर्जुन कांबळे यांनी विशेष सहकार्य केले.
No comments:
Post a Comment