साहित्य म्हणजे जीवनाचा आरसा: प्रा.शिवाजी देसाई
बिद्री.साहित्य म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनाचा आरसा असतो.आपल्या आयुष्यात किंवा आजूबाजूच्या समाजात ज्या घटना घडतात त्या तो बघतो आणि आपल्या साहित्यात संवेदनशीलतेने वास्तवाने मांडतो. या निवडक घटना वाचकांना आवडल्या की ते साहित्य लोकप्रिय होते. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनातील निवडक साहित्याची मांडणी केली पाहिजे असे प्रतिपादन कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्रा. शिवाजी देसाई यांनी केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित केलेल्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अंतर्गत नवोदित लेखकांशी संवाद या कार्यक्रमाचा.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी साहित्य लेखनासंबंधी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय पाटील होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना साहित्य लेखनासंबंधी मार्गदर्शन करताना साहित्याची मूलभूत तत्वे समजावून सांगितली. यावेळी विचार मंचावर ग्रंथपाल अतुल नगरकर,नॅक समन्वयक डॉ .एस.जी.खानापुरे प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक डॉ. प्रदीप कांबळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.सुहानी पाटील यांनी केले.आभार प्रा.डॉ.वैशाली कांबळे यांनी मानले.
No comments:
Post a Comment