बिद्री.अभ्यासात सातत्य ठेवले व नवीन शिकण्याचा ध्यास ठेवल्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होणे सहज शक्य आहे. कठोर मेहनत आणि कोणताही शॉर्टकट न ठेवता सर्व गोष्टींचा ,सर्व विषयांचा सर्वांगीन अभ्यास केला पाहिजे असे प्रतिपादन एमपीएससी परीक्षा पास होऊन व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय, मुंबई महाराष्ट्र राज्यअधिकार पदावर रोहा येथे कार्यरत असलेले अभिषेक पाटील यांनी केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद या शिवाजी विद्यापीठ मान्यता प्राप्त कोर्सच्या वतीने आयोजित केलेल्या प्रकट मुलाखत कार्यक्रमाचे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना यश मिळवताना कसा संयम ठेवायला हवा , अभ्यासाच्या वेगवेगळ्या ट्रिक तसेच थोड्याशा यशाने हुरळून न जाता सातत्य ठेवले पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संजय पाटील होते. यावेळी अभिषेक पाटील यांचे वडील प्रा.आर.के.पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर प्रा.डॉ.आनंद वारके उपस्थित होते.पाहुण्यांची ओळख प्रा.अतुल नगरकर यांनी करून दिली. कार्यक्रमाचे स्वागत ,प्रास्ताविक , सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ. प्रदीप कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी तसेच प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
बिद्री.कवितेमुळे माणसाला जगणे सहज सोपे होते,कारण जगण्याची अस्वस्थता कवितेतून कवी मांडत असतो, महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने कव...
-
बिद्री.दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या साठी स्ट्रेचर भेट दिले. महाविद्यालयात ...
No comments:
Post a Comment