Wednesday, February 5, 2025
जगण्याच्या अस्वस्थतेतून चांगली कविता जन्म घेते : प्राचार्य डॉ. संजय पाटील
बिद्री.कवितेमुळे माणसाला जगणे सहज सोपे होते,कारण जगण्याची अस्वस्थता कवितेतून कवी मांडत असतो, महाविद्यालयीन जीवनात प्रत्येक विद्यार्थ्याने कविता केली पाहिजे ते त्याच्या जिवंतपणाचे लक्षण असते असे मत प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभागाने आयोजित केलेल्या काव्यसंमेलनात व्यक्त केले. यावेळी अदिती कुलकर्णी ,साक्षी पाटील,सायली चव्हाण, कोमल कुंभार, सोनल जमनिक , गौरी घारे, प्रणय पाटील, ओंकार वाडकर यांनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एच.डी धायगुडे प्रा.अविनाश कांबळे,प्रा. दिगंबर पाटील, प्र.किशोर पाटील, प्रा .सुनील सुतार,प्रा. सुहानी पाटील, प्रा.माया पाटील , प्रा. गौतम कांबळे यांच्या सोबत प्रा. डॉ. आनंद वारके यांनी कविता सादर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ .प्रदीप कांबळे यांनी केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे -प्राचार्य डॉ.संजय पाटील
दूधसाखर महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय पाटील ...
-
दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आयोजित वाचनकट्टा उपक्रमात सहभागी विद्यार्थी व प्राचार्य डॉ.संजय पाटील बिद्री. मराठी भाषा संवर्धन ...
-
बिद्री. पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन आज तरुण पिढी बरबाद होती आहे.31 डिसेंबर च्या नावाखाली, वर्ष पूर्तीच्या निमित्ताने तरुणा...
-
दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित स्वरचित कविता वाचन करताना नम्रता देसाई,विचारमंचावर प्राचार्य डॉ.संजय पाटील व इतर बिद्री...
No comments:
Post a Comment