बिद्री; (प्रतिनिधी), भारताच्या असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी व मराठा या वृत्तपत्रातून सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील जे विचार मांडले ते त्या काळाबरोबरच आजच्या काळात ही आदर्शवतच आहेत. त्यांनी केलेले लेखन, त्यांनी घालून दिलेले आदर्श,स्वातंत्र्या विषयीचे कार्य आजही तरुण पिढीने स्वीकारले पाहिजेत असे मत प्राचार्य डॉ .संजय पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक जयंतीचे. यावेळी त्यांनी लोकमान्य टिळकांच्या जीवन प्रवासा संबंधी आणि कार्याविषयी माहिती दिली. टिळकांनी सुरू केलेले वेगवेगळे सार्वजनिक उत्सव आज कोणत्या रूपाला पोहोचले आहेत याबद्दल खंत व्यक्त करून टिळकांच्या तत्कालीन उद्देशाचा विसर पडू नये अशा भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ .आनंद वारके यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. श्रीकृष्ण साळोखे होते. सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा .सौ.सुहानी पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक , प्रशासकीय कर्मचारी ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment