Sunday, January 5, 2025
वाढदिवसानिमित्त दूधसाखरच्या प्राचार्यांनी दिली विद्यार्थ्यांना अनोखी भेट.
बिद्री.दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या साठी स्ट्रेचर भेट दिले. महाविद्यालयात इतरत्र फिरत असताना, खेळत असताना विद्यार्थी,विद्यार्थिनी चक्कर येऊन पडतात किंवा काही छोटे मोठे अपघात होतात. अशा विद्यार्थ्यांना विशेषता विद्यार्थिनींना लेडीज रूम पर्यंत किंवा दवाखान्यात नेण्यासाठी गाडीपर्यंत घेऊन जाणे अशक्य होते. यासाठी प्राचार्यांनी या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या स्ट्रेचरवरून सुरक्षित ठिकाणी, रूममध्ये आणण्यासाठी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून स्ट्रेचर भेट दिले. प्राचार्य डॉ. संजय पाटील हे प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाला एक वाचन कट्टा बांधून देत असतात.आत्तापर्यंत त्यांनी महाविद्यालय परिसरात सात वाचनकट्टे बांधून दिलेले आहेत.ज्याचा वापर विद्यार्थी,विद्यार्थिनी,पालक,खेळाडू,ज्येष्ठ नागरिक करतात.तसेच अनेक सामाजिक उपक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी महाविद्यालयाला स्ट्रेचर भेट देताना बिद्री कारखान्याचे संचालक पंडितराव केणे, रणजीत मुडूकशिवाले,संचालिका सौ .रंजना पाटील, सौ.क्रांती पाटील याबरोबरच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अनोख्या भेटीबद्दल उपस्थित सर्वांनी प्राचार्य डॉ.संजय पाटील यांचेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.त्यांच्या या उपक्रमाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आयोजित वाचनकट्टा उपक्रमात सहभागी विद्यार्थी व प्राचार्य डॉ.संजय पाटील बिद्री. मराठी भाषा संवर्धन ...
-
बिद्री. समाजातील उपेक्षित लोकांच्या सुखदुःखाची मांडणी करून साहित्यामध्ये वेदना, विद्रोह, नकार ,मानवता आणण्याचे काम महान साहित्यिक अण्णाभाऊ...
-
दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित स्वरचित कविता वाचन करताना नम्रता देसाई,विचारमंचावर प्राचार्य डॉ.संजय पाटील व इतर बिद्री...
No comments:
Post a Comment