Monday, February 26, 2024

कुसुमाग्रजांचे लेखन ही मराठी भाषेला अमोल देणगी: प्राचार्य डॉ .संजय पाटील

 

दूधसाखर महाविद्यालयात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य डॉ.संजय पाटील व डॉ. आनंद वारके

प्राचार्य डॉ .संजय पाटील यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त  मराठी विभागाने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन केले.

कुसुमाग्रजांच्या निवडक साहित्याच्या भित्तीपत्रकेचे उद्घाटन डॉ.एस. ए.साळोखे यांचे हस्ते करण्यात आले

बिद्री ः मराठी भाषा ही राजभाषा आहे. तिच्यातील लेखन, त्याचबरोबर तिची बोलीची परंपरा खूप दीर्घ अशी आहे .त्यामुळे दर्जेदार ,मानव मुक्तीचे , सामाजिक भान असलेले साहित्य ही जागतिक साहित्याला मराठी भाषेने दिलेली देणगी आहे. यामध्ये कुसुमाग्रजांचे  लेखन ही मराठी भाषेला अमोल देणगी   आहे .त्यांनी लिहिलेल्या कविता ,नाटके, ललित निबंध, कादंबऱ्या या सगळ्याच वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण आहेत म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. असे प्रतिपादन  प्राचार्य डॉ .संजय पाटील यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त  मराठी विभागाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले. अध्यक्षस्थानी नॅक सह समन्वयक डॉ. एस.ए.साळोखे होते.प्राचार्य डॉ.संजय पाटील यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमचे पुजन केले तर कुसुमाग्रजांच्या निवडक साहित्याच्या भित्तीपत्रकेचे उद्घाटन डॉ.एस. ए.साळोखे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी  महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा .डॉ .आनंद वारके यांनी मानले.



Wednesday, January 24, 2024

कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त कराव्यात.-प्राचार्य संजय पाटील.

दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित स्वरचित कविता वाचन करताना नम्रता देसाई,विचारमंचावर प्राचार्य डॉ.संजय पाटील व इतर

बिद्री-विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात आलेले अनुभव तसेच आयुष्यात घडलेल्या घटना यांच्या आधाराने कविता लिहावी. ज्यामुळे कविता जिवंत होते आणि रसिक वाचकांच्या पसंतीस उतरते.  व्यक्त झाल्यामुळे अनेक दिवस मनात साचलेल्या मानसिक त्रासापासून आपणमुक्त होतो ,असे प्रतिपादन दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी महाविद्यालयात मराठी विभागाने मराठी भाषा पंधरवडा निमित्त आयोजित स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कवितांचे वाचन केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सायली चव्हाण हिने ,द्वितीय क्रमांक प्रार्थना  कांबळे हिने तर  तृतीय क्रमांक नम्रता देसाई या विद्यार्थिनीने मिळविला. कार्यक्रमाचे स्वागत ,प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले. तर आभार प्रा.गौतम कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा . ए.बी.माने, ग्रंथपालअतुलनगरकर ,डॉ.एन.एम.पाटील, प्रा.किशोर पाटील, प्रा.दिगंबर पाटील, प्रा.अविनाश कांबळे, प्रा.सुहानी पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापक तसेच सिद्धार्थ पाटील हे प्रशासकीय कर्मचारी ही उपस्थित होते.

Wednesday, January 17, 2024

दूधसाखर महाविद्यालयात वाचन कट्टा उपक्रम उत्साहात

 

दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आयोजित  वाचनकट्टा उपक्रमात सहभागी विद्यार्थी व प्राचार्य डॉ.संजय पाटील

बिद्री. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त वाचन कट्टा उपक्रम आयोजित केला होता.विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी  आणि वाचनामुळे जगणे समृद्ध होते हे कळावे यासाठी दूधसाखर महाविद्यालयात प्रतिवर्षी मा.प्राचार्य यांनी स्वखर्चातून बांधलेल्या  वाचनट्यावर हा उपक्रम आयोजित केला जातो. यावर्षीही हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित केला. यामध्ये कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी वाचन कट्ट्यावर कांहीं सहित्यकृतींचे प्रकट वाचन केले. त्यामध्ये  सिमरन फराक्टे,सायली चव्हाण यांनी विंदा करंदीकर यांच्या  कवितांचे  व प्राजक्ता देसाई हिने अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरी संबंधी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी केला. आभार प्रा. डॉ.आनंद वारके यांनी मांडले.यावेळी प्रा. ए.बी. माने, प्रा.डॉ.शिवाजी परीट , प्रा.गौतम कांबळे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Monday, January 15, 2024

जबरदस्त इच्छाशक्ती व नियोजनबद्ध अभ्यास असेल तर कोणतीही परीक्षा पास होणे अवघड नाही-श्री.विनायक पाटील

 

दूधसाखर मध्ये माझी यशोगाथा या विषयावर बोलताना विनायक पाटील,सोबत प्राचार्य डॉ.संजय पाटील,डॉ.एस. ए.साळोखे,डॉ.प्रदीप कांबळे

बिद्री.-आपली परिस्थिती बदलायची असेल व कष्ट करण्याची जबरदस्त तयारी, अभ्यास करण्यासाठी  इच्छाशक्ती असेल तर कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होणे अवघड नाही. तसेच नियोजनबद्ध अभ्यास हा आपल्याला  यशापर्यंत जाण्यासाठी उपयोगी पडतो. असे मत नुकतेच उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झालेले मुदाळ येथील श्री विनायक नंदकुमार पाटील यांनी दूधसाखर महाविद्यालय, बिद्री येथे आयोजित ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद या या कोर्स अंतर्गत आयोजित केलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.                                     पाटील पुढे म्हणाले, की आजच्या काळात नोकरीसाठी भरपूर पैसे मोजावे लागत आहेत. अशावेळी कष्ट करण्याची इच्छाशक्ती तसेच चिंतन  करण्याची शक्ती या गोष्टी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देऊ शकतात. या कोर्समधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनाचा आढावा  प्रश्न विचारून माहित करून घेतला. यावेळी विचार मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .संजय पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.प्रदीप कांबळे यांनी व्यक्त केले. तर आभार महाविद्यालयाचे नॅक सह समन्वयक डॉ.एस. ए .साळोखे यांनी व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Saturday, December 30, 2023

दूधसाखर मध्ये 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला प्राचार्य डॉ.संजय पाटील यांच्या मार्फत दूध वाटप झाले


बिद्री. पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन आज तरुण पिढी बरबाद होती आहे.31 डिसेंबर च्या नावाखाली, वर्ष पूर्तीच्या निमित्ताने तरुणांनी दारू,अंमली पदार्थांचे सेवन करून आपल्या शरीराची नासाडी करू नये, कुटुंब,समाज,देश,मानवजातीची मानहानी करू नका,त्याऐवजी दूध प्या आणि निरोगी रहा असे अवाहन प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी केले.ते प्रतिवर्षाप्रमाणे  दूधसाखर महाविद्यालयात दूधवाटप प्रसंगी बोलत होते.                  डॉ.पाटील पुढे म्हणाले,आपले आरोग्य चांगले असणे हे आपल्यासाठी,कुटुंबासाठी,समाजासाठी,देशासाठी महत्वाचे आहे.निरोगी शरीरात निरोगी मन असते.भारताच्या उज्वल भवितव्यासाठी तरुण सशक्त,निरोगी हवा. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना ,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दूध वाटप केले. गेली दहा वर्षे  प्राचार्य डॉ.संजय पाटील यांचेकडून वर्षाच्या अखेरीस दूध वाटप आणि वाईट व्यसनांच्या  आहारी तरुण जाऊ नयेत म्हणून प्रबोधन सुरू आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tuesday, December 26, 2023

मॉरिशस च्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधीजींची प्रेरणा. प्राचार्य डॉ.संजय पाटील

मॉरिशस मध्ये निबंधवाचन करताना प्राचार्य डॉ.संजय पाटील, मराठी विभागप्रमुख डॉ.मधुमती कुंजल , शिविमचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव, डॉ.शिवाजी होडगे व इतर

बिद्री .सत्य ,अहिंसा आणि सत्याग्रह यांची कास धरून महात्मा गांधीजींनी जसे भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याप्रमाणे मॉरिशसला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महात्मा गांधींची प्रेरणा मिळाली ,असे प्रतिपादन   दूधसाखर महाविद्यालय, बिद्रीचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले. त्यांनी मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मधील मराठी विभागाने आयोजित केलेल्या "भारत- मॉरिशस आंतरसांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध : कला,साहित्य आणि संस्कृती यावरील प्रभाव" या मुख्य विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय, आंतरशाखीय चर्चासत्रात "महात्मा गांधीजींचे शेतकरी, शेतमजूर व कामगार यांच्यासाठी दक्षिण आफ्रिका, मॉरिशियस, फिजी व भारत या देशात केलेले कार्य" या विषयावरचा शोध निबंध सादर केला  त्यावेळी प्रथम सत्राच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. मॉरिशस मधील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ.मधुमती कुंजल या प्रमुख उपस्थित होत्या.  प्राचार्य डॉ.संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रथम सत्रात अकरा शोधनिबंधकारांनी विविध विषयावरचे आपले       शोधनिबंध सादर केले.            प्राचार्य डॉ.पाटील पुढे म्हणाले, भारताप्रमाणे महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मॉरिशसला मुक्त करण्यासाठी तेथील  शेतकरी ,शेतमजूर व कामगार यांना शिक्षण आणि सत्याग्रह या मार्गांची जाणीव जागृती करून दिली. सन 1901 मध्ये महात्मा गांधी मॉरिशस मध्ये 18 दिवसांसाठी वास्तव्यास होते. त्यावेळी तेथील लोकांची दुर्दशा पाहून गांधीजींनी त्या लोकांना सामाजिक ,आर्थिक आणि राजकीय अधिकारांची जाणीव करून दिली. गांधीजींचे हे सर्वात मोठे योगदान मॉरिशसमध्ये मानले जाते. गांधीजींनी आपले बॅरिस्टर मित्र श्री. मनीलाल ठाकूर यांना मॉरिशसमध्ये पाठवून 'पोर्ट लुईस 'येथून "हिंदुस्तानी" नावाचे वृत्तपत्र काढण्यास सांगितले. या वृत्तपत्रातून इंग्रजी राजवटीच्या अन्यायाच्या बातम्या सर्वसामान्यांना कळू लागल्या. शिक्षण आणि स्वातंत्र्याविषयी जाणीव जागृती झाल्यामुळे मॉरिशस मधील सर्वसामान्य लोकांनी इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त होण्यासाठी जनआंदोलने, चळवळी उभारल्या. यातून रामगुलामन नावाचा एक भारतीय कामगार हा मॉरिशसचा नेता म्हणून उदयास आला. तेहतीस वर्षांच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर 12 मार्च 1968 रोजी मॉरिशस इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला. त्यावेळी मा.शिवसागर रामगुलामन यांनी मॉरिशसचे पहिले मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून शपथ घेतली .या पाठीमागे महात्मा गांधीजींची प्रेरणा आहे. म्हणून आजही मॉरिशसमध्ये महात्मा गांधीजींना मानाचे स्थान आहे. महात्मा गांधीजींच्या या योगदानाचा इतिहास मॉरिशस आणि जगभरातल्या लोकांना कळावा म्हणून महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ही संस्था प्रसार आणि प्रचाराचे काम करते आहे ,ही भारतीयांसाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे .                मॉरिशस येथील चर्चासत्राचे नियोजन महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मोका ,मराठी विभाग मॉरिशस ,शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ,कोल्हापूर आणि सातारा येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन मॉरिशसचे संसद सदस्य आशलेय  इट्ट यांच्या हस्ते झाले .यावेळी इंद्रजीत राय, वाय .मनुबोध, डॉ. आर. अप्पाडू , मराठीविभाग प्रमुख डॉ.मधुमती कुंजल, गांधी इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ.राजकुमार रामप्रताप, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष असंत गोविंद,  मराठी भाषा मंडळाचे नितीन बापू,  प्रा.डॉ. बिदन आबा ,शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव ,डॉ.प्रकाश दुकळे, डॉ. मांतेस हिरेमठ ,डॉ. शिवकुमार सोनाळकर, डॉ.अनिल गवळी, डॉ. शिवाजी होडगे ,भारतातील विविध भागातील मराठी विषयासह विविध विषयांचे 50 प्राध्यापक, मॉरिशस मधील प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

Tuesday, November 14, 2023

प्राचार्य डॉ. संजय पाटील मॉरिशस येथील आंतरराष्ट्रीय चर्चासत्रासाठी रवाना

 

बिद्री. मॉरिशस येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्र व अभ्यास दौऱ्यासाठी दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील नुकतेच रवाना झाले आहेत. भारत मॉरिशस आंतर सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध, कला साहित्य आणि संस्कृती यास अनुसरून  शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ आणि मॉरिशस विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 आणि 24 नोव्हेंबर 2023 रोजी आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले आहे .या चर्चासत्राच्या निमित्ताने भारत आणि मॉरिशस राजकीय सांस्कृतिक संबंध ,मॉरिशस देशाची राजकीय सामाजिक परिस्थिती, शिक्षण कृषी साहित्य क्षेत्रातील वाटचाल, महात्मा गांधी आणि त्यांचे कार्य ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे, मराठी भाषेचा मॉरिशस मधील कला साहित्य आणि संस्कृतीवर काय व कसा परिणाम झाला याचा अभ्यास करणे आणि आंतरराष्ट्रीय संबंध याविषयी अभ्यास करण्यासाठी या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे .अशा विविध बाबींचा समावेश असून उद्घाटक म्हणून मॉरिशसचे उपपंतप्रधान डॉ. अविनाश तिलक उपस्थित राहणार आहेत. महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मॉरिशसचे डायरेक्टर जनरल डॉ. राजकुमार रामप्रताप, डॉ. मधुमती कुंजल ,मॉरिशस मराठी फेडरेशनचे अध्यक्ष असंत गोविंद ,डॉ. बिदल अबा,शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव, समन्वयक डॉ.प्रकाश दुकळे उपस्थित राहणार आहेत. या चर्चासत्रामध्ये प्राचार्य डॉ. संजय पाटील हे "महात्मा गांधीजींचे  शेतकरी, शेतमजूर व कामगार यांच्यासाठी दक्षिण आफ्रिका , मॉरिशियस,फिजी व भारत या देशात केलेले कार्य "या शोध निबंधाचे वाचन करणार आहेत. डॉ. पाटील यांना दूधसाखर शिक्षण प्रसारक मंडळाचे  सचिव सर्जेराव किल्लेदार ,सर्व स्टाफ यांनी अभिनंदन करून  शुभेच्छा दिल्या .डॉ.संजय पाटील यांचे यापूर्वी विद्यापीठ ,राज्यस्तरीय, राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय शोधनिबंध प्रसिद्ध  झालेले आहेत.

गझल जगण्याचे भान देते : डॉ. स्नेहल कुलकर्णी

बिद्री : "गझल लेखन व श्रवण जगण्याला बळ देत असते" असे मत महाराष्ट्रातील नामवंत गझलकार डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. त्या य...