बिद्री. पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन आज तरुण पिढी बरबाद होती आहे.31 डिसेंबर च्या नावाखाली, वर्ष पूर्तीच्या निमित्ताने तरुणांनी दारू,अंमली पदार्थांचे सेवन करून आपल्या शरीराची नासाडी करू नये, कुटुंब,समाज,देश,मानवजातीची मानहानी करू नका,त्याऐवजी दूध प्या आणि निरोगी रहा असे अवाहन प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी केले.ते प्रतिवर्षाप्रमाणे दूधसाखर महाविद्यालयात दूधवाटप प्रसंगी बोलत होते. डॉ.पाटील पुढे म्हणाले,आपले आरोग्य चांगले असणे हे आपल्यासाठी,कुटुंबासाठी,समाजासाठी,देशासाठी महत्वाचे आहे.निरोगी शरीरात निरोगी मन असते.भारताच्या उज्वल भवितव्यासाठी तरुण सशक्त,निरोगी हवा. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना ,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दूध वाटप केले. गेली दहा वर्षे प्राचार्य डॉ.संजय पाटील यांचेकडून वर्षाच्या अखेरीस दूध वाटप आणि वाईट व्यसनांच्या आहारी तरुण जाऊ नयेत म्हणून प्रबोधन सुरू आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे -प्राचार्य डॉ.संजय पाटील
दूधसाखर महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय पाटील ...
-
दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आयोजित वाचनकट्टा उपक्रमात सहभागी विद्यार्थी व प्राचार्य डॉ.संजय पाटील बिद्री. मराठी भाषा संवर्धन ...
-
बिद्री. पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन आज तरुण पिढी बरबाद होती आहे.31 डिसेंबर च्या नावाखाली, वर्ष पूर्तीच्या निमित्ताने तरुणा...
-
दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित स्वरचित कविता वाचन करताना नम्रता देसाई,विचारमंचावर प्राचार्य डॉ.संजय पाटील व इतर बिद्री...
No comments:
Post a Comment