Wednesday, January 24, 2024

कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त कराव्यात.-प्राचार्य संजय पाटील.

दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित स्वरचित कविता वाचन करताना नम्रता देसाई,विचारमंचावर प्राचार्य डॉ.संजय पाटील व इतर

बिद्री-विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात आलेले अनुभव तसेच आयुष्यात घडलेल्या घटना यांच्या आधाराने कविता लिहावी. ज्यामुळे कविता जिवंत होते आणि रसिक वाचकांच्या पसंतीस उतरते.  व्यक्त झाल्यामुळे अनेक दिवस मनात साचलेल्या मानसिक त्रासापासून आपणमुक्त होतो ,असे प्रतिपादन दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी महाविद्यालयात मराठी विभागाने मराठी भाषा पंधरवडा निमित्त आयोजित स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कवितांचे वाचन केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सायली चव्हाण हिने ,द्वितीय क्रमांक प्रार्थना  कांबळे हिने तर  तृतीय क्रमांक नम्रता देसाई या विद्यार्थिनीने मिळविला. कार्यक्रमाचे स्वागत ,प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले. तर आभार प्रा.गौतम कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा . ए.बी.माने, ग्रंथपालअतुलनगरकर ,डॉ.एन.एम.पाटील, प्रा.किशोर पाटील, प्रा.दिगंबर पाटील, प्रा.अविनाश कांबळे, प्रा.सुहानी पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापक तसेच सिद्धार्थ पाटील हे प्रशासकीय कर्मचारी ही उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे -प्राचार्य डॉ.संजय पाटील

दूधसाखर महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय पाटील ...