दूधसाखर महाविद्यालयात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य डॉ.संजय पाटील व डॉ. आनंद वारके
प्राचार्य डॉ .संजय पाटील यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागाने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन केले.
कुसुमाग्रजांच्या निवडक साहित्याच्या भित्तीपत्रकेचे उद्घाटन डॉ.एस. ए.साळोखे यांचे हस्ते करण्यात आले
बिद्री ः मराठी भाषा ही राजभाषा आहे. तिच्यातील लेखन, त्याचबरोबर तिची बोलीची परंपरा खूप दीर्घ अशी आहे .त्यामुळे दर्जेदार ,मानव मुक्तीचे , सामाजिक भान असलेले साहित्य ही जागतिक साहित्याला मराठी भाषेने दिलेली देणगी आहे. यामध्ये कुसुमाग्रजांचे लेखन ही मराठी भाषेला अमोल देणगी आहे .त्यांनी लिहिलेल्या कविता ,नाटके, ललित निबंध, कादंबऱ्या या सगळ्याच वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण आहेत म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ .संजय पाटील यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त मराठी विभागाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले. अध्यक्षस्थानी नॅक सह समन्वयक डॉ. एस.ए.साळोखे होते.प्राचार्य डॉ.संजय पाटील यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमचे पुजन केले तर कुसुमाग्रजांच्या निवडक साहित्याच्या भित्तीपत्रकेचे उद्घाटन डॉ.एस. ए.साळोखे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा .डॉ .आनंद वारके यांनी मानले.
No comments:
Post a Comment