Sunday, January 5, 2025

दूधसाखर महाविद्यालयात माझी साहित्यनिर्मिती या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. शिवाजी देसाई विचारमंचावर प्राचार्य डॉ. संजय पाटील नॅक समन्वयक डॉ. एस. जी. खानापुरे, ग्रंथपाल अतुल नगरकर.

साहित्य म्हणजे जीवनाचा आरसा: प्रा.शिवाजी देसाई 
बिद्री.साहित्य म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनाचा आरसा असतो.आपल्या आयुष्यात किंवा आजूबाजूच्या समाजात ज्या घटना घडतात त्या तो बघतो आणि आपल्या साहित्यात संवेदनशीलतेने वास्तवाने मांडतो. या निवडक घटना वाचकांना आवडल्या की ते साहित्य लोकप्रिय होते. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनातील निवडक साहित्याची मांडणी केली पाहिजे असे प्रतिपादन कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्रा. शिवाजी देसाई यांनी  केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित केलेल्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अंतर्गत नवोदित लेखकांशी संवाद या कार्यक्रमाचा.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी साहित्य लेखनासंबंधी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  प्राचार्य डॉ. संजय पाटील होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना साहित्य लेखनासंबंधी मार्गदर्शन करताना साहित्याची मूलभूत तत्वे समजावून सांगितली. यावेळी विचार मंचावर ग्रंथपाल अतुल नगरकर,नॅक समन्वयक डॉ .एस.जी.खानापुरे प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमास  सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
कार्यक्रमाचे स्वागत व       प्रास्तविक डॉ. प्रदीप कांबळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.सुहानी पाटील यांनी केले.आभार प्रा.डॉ.वैशाली कांबळे यांनी मानले.


दूधसाखर महाविद्यालयात 31 डिसेंबर रोजी दूधवाटप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी

दूध पिऊन जल्लोष करा. प्राचार्य डॉ. संजय पाटील बिद्री.सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण दूध पिऊन जल्लोषात करूया असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले. ते दूधसाखर  महाविद्यालयात 31 डिसेंबर रोजीच्या दूध वाटप्रसंगी बोलत होते. डॉ.पाटील पुढे म्हणाले, 31 डिसेंबर प्रत्येक वर्षी येतो परंतु तो आपला भारतीय सण नाही. पाश्यात्यांच्या अंधानुकरणातून आमचा आजचा तरुण व्यसनाधीन बनत आहे. आजच्या दिवसात विक्रमी मद्य विक्री होते हे भूषणावर नाही. यातून देशाची तरुण पिढी बरबाद होते आहे. शेवटी वाईट व्यसनांची बदनामी करून भारतीय संस्कृतीचे जतन करून आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी दूध प्या, निरोगी रहा आणि जल्लोष करा असे आवाहन त्यांनी केले. सुरुवातीस डॉ. आनंद  वारके यांनी आयुर्वेदिक कढिचे वाटप केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Tuesday, September 3, 2024

उपेक्षितांच्या दुःखाला वाचा फोडण्याचे काम साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी केले : प्राचार्य डॉ.संजय पाटील

 बिद्री. समाजातील उपेक्षित लोकांच्या सुखदुःखाची मांडणी करून साहित्यामध्ये वेदना, विद्रोह, नकार ,मानवता आणण्याचे काम महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यांचे साहित्य हे अजरामर आणि भारतीय पातळीवर सर्वश्रेष्ठ ठरलेले साहित्य आहे .त्यांच्या या कार्याचा मान म्हणून त्यांना भारतरत्न दिला जावा. तसेच इंग्रजांच्या विरुद्ध सक्षमपणे लेखणीची लढाई देऊन आपल्या मराठा व केसरी या दैनिकांच्या माध्यमातून लोकांना जागृत करणाऱ्या लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती च्या संयुक्त प्रतिमापूजन तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या संकलित साहित्याच्या भितीपत्रकाचे उद्घाटन कार्यक्रमाचे. डॉ.एस. ए.साळोखे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक हवलदार तसेच महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी ,सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत,प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. आनंद वारके यांनी मानले.
दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक  पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवन चरित्राची माहिती देताना प्राचार्य डॉ.संजय पाटील,उपस्थित डॉ.आनंद वारके, डॉ.प्रदीप कांबळे

श्रावणधारा या भितीपत्रकाचे उद्घाटन

साहित्यातून  समाजाचाचे प्रतिबिंब दिसते : प्राचार्य डॉ .संजय पाटील. 
साहित्य आणि समाज यांचा जवळचा संबंध असतो ,समाजात घडणाऱ्या अनेक घटनांचा प्रभाव साहित्यात पडत असतो आणि  विद्यार्थ्यांना आव्हान केल्याप्रमाणे त्यांनी श्रावण महिन्याच्या या काळात आपल्या मनात घडणाऱ्या अनेक उलथापालथीचे चित्रण साहित्यात करावं असे आव्हान केल्यानंतर आपल्या कविता आमच्याकडे दिल्या, आणि त्या मी प्रकाशित केल्या त्याबद्दल लेखक कवी असलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि असाच प्रयत्न सर्व विद्यार्थ्यांनी करावा असे आवाहन 
 प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित 'श्रावणधारा' या भितीपत्रकाच्या उद्घाटनाचे. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक प्रा. डॉ. आनंद वारके यांनी केले तर उपस्थिताचे आभार डॉ. प्रदीप कांबळे यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे नॅक समन्वयक प्रा.डॉ.एस.जी. खानापुरे, प्रा. गौतम कांबळे, प्रा. अविनाश कांबळे , प्रा. ए .बी. माने, प्रा.सुहानी पाटील, प्रा .वैशाली कांबळे तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व प्राध्यापक व प्रशासकीय सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी विभाग आयोजित दूधसाखर मध्ये श्रावणधारा या भितीपत्रकाचे उद्घाटन करताना  प्राचार्य डॉ .संजय पाटील सोबत नॅक समन्वयक खानापुरे व विद्यार्थी

Thursday, August 29, 2024

महादेव मोरे यांना श्रद्धांजली

भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 77 व्या वर्धापन दिनानिमित्त महाविद्यालयामध्ये स्वातंत्र्यवीरांच्या कर्तृत्वावर मराठी व हिंदी कवितांच्या प्रकाशन प्रसंगी प्राचार्य डॉ. संजय पाटील व इतर सर्व प्राध्यापक. मराठी व आणि हिंदी विभागाने या भित्तीपत्रकाचे नियोजन केले होते.

Monday, February 26, 2024

कुसुमाग्रजांचे लेखन ही मराठी भाषेला अमोल देणगी: प्राचार्य डॉ .संजय पाटील

 

दूधसाखर महाविद्यालयात कुसुमाग्रजांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य डॉ.संजय पाटील व डॉ. आनंद वारके

प्राचार्य डॉ .संजय पाटील यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त  मराठी विभागाने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन केले.

कुसुमाग्रजांच्या निवडक साहित्याच्या भित्तीपत्रकेचे उद्घाटन डॉ.एस. ए.साळोखे यांचे हस्ते करण्यात आले

बिद्री ः मराठी भाषा ही राजभाषा आहे. तिच्यातील लेखन, त्याचबरोबर तिची बोलीची परंपरा खूप दीर्घ अशी आहे .त्यामुळे दर्जेदार ,मानव मुक्तीचे , सामाजिक भान असलेले साहित्य ही जागतिक साहित्याला मराठी भाषेने दिलेली देणगी आहे. यामध्ये कुसुमाग्रजांचे  लेखन ही मराठी भाषेला अमोल देणगी   आहे .त्यांनी लिहिलेल्या कविता ,नाटके, ललित निबंध, कादंबऱ्या या सगळ्याच वैशिष्ट्यपूर्ण व वैविध्यपूर्ण आहेत म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. असे प्रतिपादन  प्राचार्य डॉ .संजय पाटील यांनी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त  मराठी विभागाने आयोजित कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून केले. अध्यक्षस्थानी नॅक सह समन्वयक डॉ. एस.ए.साळोखे होते.प्राचार्य डॉ.संजय पाटील यांच्या हस्ते कुसुमाग्रजांच्या प्रतिमचे पुजन केले तर कुसुमाग्रजांच्या निवडक साहित्याच्या भित्तीपत्रकेचे उद्घाटन डॉ.एस. ए.साळोखे यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी  महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत, प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा .डॉ .आनंद वारके यांनी मानले.



गझल जगण्याचे भान देते : डॉ. स्नेहल कुलकर्णी

बिद्री : "गझल लेखन व श्रवण जगण्याला बळ देत असते" असे मत महाराष्ट्रातील नामवंत गझलकार डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी व्यक्त केले. त्या य...