Tuesday, September 19, 2023
महानोरांची कविता अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारी- प्राचार्य डॉ संजय पाटील
बिद्री -" ना. धो. महानोर यांच्या कवितेतून अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन अत्यंत सुंदरपणे आले आहे, त्यांनी आपल्या कवितेत वापरलेल्या प्रतिमा आणि प्रतीकांच्या साह्याने ग्रामीण जीवन अधिक उलगडून दाखविले गेले आहे " असे मत दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले.ते महाविद्यालयात आयोजित "श्रद्धांजली रानकवीला "या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी महानोर यांच्या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमात प्रा. डॉ .आनंद वारके यांनी महानोरांचा जीवन परिचय करून दिला आणि कवितेची वैशिष्ट्य सांगितली. सूत्रसंचालन प्रा. ए. बी. माने यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी मांडले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी, व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
-
बिद्री.दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या साठी स्ट्रेचर भेट दिले. महाविद्यालयात ...
-
बिद्री.अभ्यासात सातत्य ठेवले व नवीन शिकण्याचा ध्यास ठेवल्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होणे सहज शक्य आहे. कठोर मेहनत आणि कोणताह...
No comments:
Post a Comment