बिद्री : टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जागृत केलेली पारतंत्र्यात असलेल्या माणसांची मने आणि समाजाला क्रांतीचा दिलेला विचार तसेच अण्णाभाऊंनी उपेक्षितांचे मांडलेले दुःख ही दोन्ही कार्य आजच्या काळात आदर्शवत आहेत असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते महाविद्यालयात आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे जयंती चे यावेळी प्राचार्यांनी लोकमान्य टिळकांचा जीवनपट व अण्णाभाऊ साठे यांचा जीवनक्रम उघडून दाखविला आणि त्यांच्या जगण्यातील संघर्षाची माहिती उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना करून दिली. यावेळी मराठी विभागातर्फे आयोजित या दोन महापुरुषांच्या आयुष्यावर आधारित माहितीपर भित्ती पत्रिके चे फित कापून उद्घाटन करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा.डॉ आनंद वारके यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक याच्या साहित्यावर आधारित भित्ती पत्रकाचे उदघाटन करताना मा. प्राचार्य डॉ. संजय पाटील. डॉ. आनंद वारके,डॉ. प्रदीप कांबळे. व विद्यार्थी.
No comments:
Post a Comment