Tuesday, September 19, 2023

साहित्य हा समाजाचा आरसा आहे. प्राचार्य डॉ. संजय पाटील

बिद्री. निसर्गातील प्रतिमा प्रतीकांच्या सहाय्याने समाज जीवनातील अनुभवाची मांडणी विद्यार्थ्यांनी केली पाहिजे कारण साहित्य हा समाजाचा आरसा आहे.आपल्या अवतीभोवतीच्या घटना साहित्यात आल्या पाहिजेत तेव्हाच ते साहित्य उत्कृष्ट ठरते ,असे प्रतिपादन प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी केले. ते दूधसाखर महाविद्यालयातील मराठी विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांनी लिहीलेल्या कवितांच्या "श्रावणधारा" या भितीपत्रकाच्या प्रकाशन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. कार्यकार्यक्रमाचे स्वागत ,प्रास्ताविक प्रा.डॉ. प्रा.डॉ.आनंद वारके यांनी तर आभार प्रा.डॉ.प्रदीप कांबळे यांनी मानले .या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दूधसाखर मध्ये मराठी विभाग आयोजित "श्रावणधारा "या भितीपत्रिकेचे प्रकाशन करताना प्राचार्य डॉ.संजय पाटील सोबत प्रा.डॉ.आनंद वारके, प्रा.डॉ.एस. ए.साळोखे, प्रा.डॉ.डी. एन .पाटील, प्रा. डॉ. प्रदीप कांबळे , प्रा.ए.बी. माने व इतर

महानोरांची कविता अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन घडविणारी- प्राचार्य डॉ संजय पाटील

बिद्री -" ना. धो. महानोर यांच्या कवितेतून अस्सल ग्रामीण जीवनाचे दर्शन अत्यंत सुंदरपणे आले आहे, त्यांनी आपल्या कवितेत वापरलेल्या प्रतिमा आणि प्रतीकांच्या साह्याने ग्रामीण जीवन अधिक उलगडून दाखविले गेले आहे " असे मत दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले.ते महाविद्यालयात आयोजित "श्रद्धांजली रानकवीला "या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी महाविद्यालयातील मराठी विभागाच्या विद्यार्थ्यांनी महानोर यांच्या कवितांचे वाचन केले. कार्यक्रमात प्रा. डॉ .आनंद वारके यांनी महानोरांचा जीवन परिचय करून दिला आणि कवितेची वैशिष्ट्य सांगितली. सूत्रसंचालन प्रा. ए. बी. माने यांनी केले. प्रास्ताविक व आभार प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी मांडले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक ,प्राध्यापिका, प्रशासकीय कर्मचारी, व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

दूधसाखर महाविद्यालयात कवी महानोर यांच्या कवितांच्या भित्तीपत्रकाचे उद्घाटन करताना प्राचार्य डॉ.संजय पाटील,सोबत डॉ. आनंद वारके,डॉ.प्रदीप कांबळे


टिळकांचे स्वातंत्र्यसंग्रामातील आणि अण्णाभाऊंचे मराठी साहित्यातील योगदान महत्त्वाचे आहे. प्राचार्य डॉ. संजय पाटील

बिद्री : टिळकांनी स्वातंत्र्यपूर्व काळात जागृत केलेली पारतंत्र्यात असलेल्या माणसांची मने आणि समाजाला क्रांतीचा दिलेला विचार तसेच अण्णाभाऊंनी उपेक्षितांचे मांडलेले दुःख ही दोन्ही कार्य आजच्या काळात आदर्शवत आहेत असे मत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते महाविद्यालयात आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे जयंती चे यावेळी  प्राचार्यांनी लोकमान्य टिळकांचा जीवनपट व अण्णाभाऊ साठे यांचा जीवनक्रम उघडून दाखविला आणि त्यांच्या जगण्यातील संघर्षाची माहिती उपस्थित विद्यार्थी व प्राध्यापकांना करून दिली. यावेळी मराठी विभागातर्फे आयोजित या दोन महापुरुषांच्या आयुष्यावर आधारित माहितीपर भित्ती पत्रिके चे फित कापून उद्घाटन  करण्यात आले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  प्रा. डॉ. प्रदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा.डॉ आनंद वारके यांनी मांडले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी  विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक याच्या साहित्यावर आधारित भित्ती पत्रकाचे उदघाटन करताना मा. प्राचार्य  डॉ. संजय पाटील. डॉ. आनंद वारके,डॉ. प्रदीप कांबळे. व विद्यार्थी.

मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे -प्राचार्य डॉ.संजय पाटील

दूधसाखर महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय पाटील ...