बिद्री.अभ्यासात सातत्य ठेवले व नवीन शिकण्याचा ध्यास ठेवल्यास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पास होणे सहज शक्य आहे. कठोर मेहनत आणि कोणताही शॉर्टकट न ठेवता सर्व गोष्टींचा ,सर्व विषयांचा सर्वांगीन अभ्यास केला पाहिजे असे प्रतिपादन एमपीएससी परीक्षा पास होऊन व्यवसाय शिक्षण आणि प्रशिक्षण संचालनालय, मुंबई महाराष्ट्र राज्यअधिकार पदावर रोहा येथे कार्यरत असलेले अभिषेक पाटील यांनी केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद या शिवाजी विद्यापीठ मान्यता प्राप्त कोर्सच्या वतीने आयोजित केलेल्या प्रकट मुलाखत कार्यक्रमाचे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना यश मिळवताना कसा संयम ठेवायला हवा , अभ्यासाच्या वेगवेगळ्या ट्रिक तसेच थोड्याशा यशाने हुरळून न जाता सातत्य ठेवले पाहिजे यासंबंधी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.संजय पाटील होते. यावेळी अभिषेक पाटील यांचे वडील प्रा.आर.के.पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. व्यासपीठावर प्रा.डॉ.आनंद वारके उपस्थित होते.पाहुण्यांची ओळख प्रा.अतुल नगरकर यांनी करून दिली. कार्यक्रमाचे स्वागत ,प्रास्ताविक , सूत्रसंचालन व आभार प्रा.डॉ. प्रदीप कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व विद्यार्थी तसेच प्रशासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Thursday, January 30, 2025
Sunday, January 5, 2025
वाढदिवसानिमित्त दूधसाखरच्या प्राचार्यांनी दिली विद्यार्थ्यांना अनोखी भेट.
बिद्री.दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या साठी स्ट्रेचर भेट दिले. महाविद्यालयात इतरत्र फिरत असताना, खेळत असताना विद्यार्थी,विद्यार्थिनी चक्कर येऊन पडतात किंवा काही छोटे मोठे अपघात होतात. अशा विद्यार्थ्यांना विशेषता विद्यार्थिनींना लेडीज रूम पर्यंत किंवा दवाखान्यात नेण्यासाठी गाडीपर्यंत घेऊन जाणे अशक्य होते. यासाठी प्राचार्यांनी या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून या स्ट्रेचरवरून सुरक्षित ठिकाणी, रूममध्ये आणण्यासाठी आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून स्ट्रेचर भेट दिले. प्राचार्य डॉ. संजय पाटील हे प्रत्येक वर्षी आपल्या वाढदिवसानिमित्त महाविद्यालयाला एक वाचन कट्टा बांधून देत असतात.आत्तापर्यंत त्यांनी महाविद्यालय परिसरात सात वाचनकट्टे बांधून दिलेले आहेत.ज्याचा वापर विद्यार्थी,विद्यार्थिनी,पालक,खेळाडू,ज्येष्ठ नागरिक करतात.तसेच अनेक सामाजिक उपक्रमातही त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी महाविद्यालयाला स्ट्रेचर भेट देताना बिद्री कारखान्याचे संचालक पंडितराव केणे, रणजीत मुडूकशिवाले,संचालिका सौ .रंजना पाटील, सौ.क्रांती पाटील याबरोबरच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या अनोख्या भेटीबद्दल उपस्थित सर्वांनी प्राचार्य डॉ.संजय पाटील यांचेविषयी कृतज्ञता व्यक्त केली.त्यांच्या या उपक्रमाबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
दूधसाखर महाविद्यालयात माझी साहित्यनिर्मिती या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. शिवाजी देसाई विचारमंचावर प्राचार्य डॉ. संजय पाटील नॅक समन्वयक डॉ. एस. जी. खानापुरे, ग्रंथपाल अतुल नगरकर.
साहित्य म्हणजे जीवनाचा आरसा: प्रा.शिवाजी देसाई
बिद्री.साहित्य म्हणजे प्रत्येक माणसाच्या जीवनाचा आरसा असतो.आपल्या आयुष्यात किंवा आजूबाजूच्या समाजात ज्या घटना घडतात त्या तो बघतो आणि आपल्या साहित्यात संवेदनशीलतेने वास्तवाने मांडतो. या निवडक घटना वाचकांना आवडल्या की ते साहित्य लोकप्रिय होते. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनातील निवडक साहित्याची मांडणी केली पाहिजे असे प्रतिपादन कर्मवीर हिरे महाविद्यालयाचे मराठी विषयाचे प्रा. शिवाजी देसाई यांनी केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित केलेल्या वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अंतर्गत नवोदित लेखकांशी संवाद या कार्यक्रमाचा.यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी साहित्य लेखनासंबंधी संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. संजय पाटील होते. त्यांनीही विद्यार्थ्यांना साहित्य लेखनासंबंधी मार्गदर्शन करताना साहित्याची मूलभूत तत्वे समजावून सांगितली. यावेळी विचार मंचावर ग्रंथपाल अतुल नगरकर,नॅक समन्वयक डॉ .एस.जी.खानापुरे प्रमुख उपस्थित होते.कार्यक्रमास सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक डॉ. प्रदीप कांबळे यांनी तर सूत्रसंचालन प्रा.सुहानी पाटील यांनी केले.आभार प्रा.डॉ.वैशाली कांबळे यांनी मानले.
दूधसाखर महाविद्यालयात 31 डिसेंबर रोजी दूधवाटप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी विद्यार्थिनी
दूध पिऊन जल्लोष करा. प्राचार्य डॉ. संजय पाटील बिद्री.सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करताना आपण दूध पिऊन जल्लोषात करूया असे आवाहन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले. ते दूधसाखर महाविद्यालयात 31 डिसेंबर रोजीच्या दूध वाटप्रसंगी बोलत होते. डॉ.पाटील पुढे म्हणाले, 31 डिसेंबर प्रत्येक वर्षी येतो परंतु तो आपला भारतीय सण नाही. पाश्यात्यांच्या अंधानुकरणातून आमचा आजचा तरुण व्यसनाधीन बनत आहे. आजच्या दिवसात विक्रमी मद्य विक्री होते हे भूषणावर नाही. यातून देशाची तरुण पिढी बरबाद होते आहे. शेवटी वाईट व्यसनांची बदनामी करून भारतीय संस्कृतीचे जतन करून आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी दूध प्या, निरोगी रहा आणि जल्लोष करा असे आवाहन त्यांनी केले. सुरुवातीस डॉ. आनंद वारके यांनी आयुर्वेदिक कढिचे वाटप केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
Subscribe to:
Posts (Atom)
मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे -प्राचार्य डॉ.संजय पाटील
दूधसाखर महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय पाटील ...
-
दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आयोजित वाचनकट्टा उपक्रमात सहभागी विद्यार्थी व प्राचार्य डॉ.संजय पाटील बिद्री. मराठी भाषा संवर्धन ...
-
बिद्री. पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन आज तरुण पिढी बरबाद होती आहे.31 डिसेंबर च्या नावाखाली, वर्ष पूर्तीच्या निमित्ताने तरुणा...
-
दूधसाखर च्या प्राची चौगले हिचा सत्कार करताना संस्था अध्यक्ष मा.के. पी. पाटील सोबत प्राचार्य डॉ. संजय पाटील, डॉ.आनंद वारके, डॉ.प्...