Wednesday, January 24, 2024

कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त कराव्यात.-प्राचार्य संजय पाटील.

दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित स्वरचित कविता वाचन करताना नम्रता देसाई,विचारमंचावर प्राचार्य डॉ.संजय पाटील व इतर

बिद्री-विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात आलेले अनुभव तसेच आयुष्यात घडलेल्या घटना यांच्या आधाराने कविता लिहावी. ज्यामुळे कविता जिवंत होते आणि रसिक वाचकांच्या पसंतीस उतरते.  व्यक्त झाल्यामुळे अनेक दिवस मनात साचलेल्या मानसिक त्रासापासून आपणमुक्त होतो ,असे प्रतिपादन दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी महाविद्यालयात मराठी विभागाने मराठी भाषा पंधरवडा निमित्त आयोजित स्वरचित काव्यवाचन स्पर्धेत व्यक्त केले. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कवितांचे वाचन केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सायली चव्हाण हिने ,द्वितीय क्रमांक प्रार्थना  कांबळे हिने तर  तृतीय क्रमांक नम्रता देसाई या विद्यार्थिनीने मिळविला. कार्यक्रमाचे स्वागत ,प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले. तर आभार प्रा.गौतम कांबळे यांनी मानले. कार्यक्रमाला प्रा . ए.बी.माने, ग्रंथपालअतुलनगरकर ,डॉ.एन.एम.पाटील, प्रा.किशोर पाटील, प्रा.दिगंबर पाटील, प्रा.अविनाश कांबळे, प्रा.सुहानी पाटील यांच्यासह महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी व प्राध्यापक तसेच सिद्धार्थ पाटील हे प्रशासकीय कर्मचारी ही उपस्थित होते.

Wednesday, January 17, 2024

दूधसाखर महाविद्यालयात वाचन कट्टा उपक्रम उत्साहात

 

दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभागातर्फे आयोजित  वाचनकट्टा उपक्रमात सहभागी विद्यार्थी व प्राचार्य डॉ.संजय पाटील

बिद्री. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त वाचन कट्टा उपक्रम आयोजित केला होता.विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी  आणि वाचनामुळे जगणे समृद्ध होते हे कळावे यासाठी दूधसाखर महाविद्यालयात प्रतिवर्षी मा.प्राचार्य यांनी स्वखर्चातून बांधलेल्या  वाचनट्यावर हा उपक्रम आयोजित केला जातो. यावर्षीही हा उपक्रम यशस्वीपणे आयोजित केला. यामध्ये कला व विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी वाचन कट्ट्यावर कांहीं सहित्यकृतींचे प्रकट वाचन केले. त्यामध्ये  सिमरन फराक्टे,सायली चव्हाण यांनी विंदा करंदीकर यांच्या  कवितांचे  व प्राजक्ता देसाई हिने अण्णाभाऊ साठे यांच्या फकिरा या कादंबरी संबंधी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले अध्यक्ष समारोप प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी केला. आभार प्रा. डॉ.आनंद वारके यांनी मांडले.यावेळी प्रा. ए.बी. माने, प्रा.डॉ.शिवाजी परीट , प्रा.गौतम कांबळे यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

Monday, January 15, 2024

जबरदस्त इच्छाशक्ती व नियोजनबद्ध अभ्यास असेल तर कोणतीही परीक्षा पास होणे अवघड नाही-श्री.विनायक पाटील

 

दूधसाखर मध्ये माझी यशोगाथा या विषयावर बोलताना विनायक पाटील,सोबत प्राचार्य डॉ.संजय पाटील,डॉ.एस. ए.साळोखे,डॉ.प्रदीप कांबळे

बिद्री.-आपली परिस्थिती बदलायची असेल व कष्ट करण्याची जबरदस्त तयारी, अभ्यास करण्यासाठी  इच्छाशक्ती असेल तर कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होणे अवघड नाही. तसेच नियोजनबद्ध अभ्यास हा आपल्याला  यशापर्यंत जाण्यासाठी उपयोगी पडतो. असे मत नुकतेच उपशिक्षणाधिकारी म्हणून निवड झालेले मुदाळ येथील श्री विनायक नंदकुमार पाटील यांनी दूधसाखर महाविद्यालय, बिद्री येथे आयोजित ग्रामीण पत्रकारिता व जनसंवाद या या कोर्स अंतर्गत आयोजित केलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.                                     पाटील पुढे म्हणाले, की आजच्या काळात नोकरीसाठी भरपूर पैसे मोजावे लागत आहेत. अशावेळी कष्ट करण्याची इच्छाशक्ती तसेच चिंतन  करण्याची शक्ती या गोष्टी स्पर्धा परीक्षेत यश मिळवून देऊ शकतात. या कोर्समधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या जीवनाचा आढावा  प्रश्न विचारून माहित करून घेतला. यावेळी विचार मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .संजय पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ.प्रदीप कांबळे यांनी व्यक्त केले. तर आभार महाविद्यालयाचे नॅक सह समन्वयक डॉ.एस. ए .साळोखे यांनी व्यक्त केले.यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी,विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

वाढदिवसानिमित्त दूधसाखरच्या प्राचार्यांनी दिली विद्यार्थ्यांना अनोखी भेट.

बिद्री.दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांच्या साठी स्ट्रेचर भेट दिले. महाविद्यालयात ...