Saturday, October 14, 2023

पत्रकारिता हा करिअरसाठी उत्तम पर्याय: प्राचार्य डॉ. संजय पाटील

 बिद्री.विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण पूर्ण करतानाच  करिअरसाठी उत्तम मार्ग म्हणून पत्रकारिता शिकणे ही आता काळाची गरज झाली आहे. या कलेच्या माध्यमातून आपण आपल्या मनातील भावना विचार व्यक्त करू शकतो आणि समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडू शकतो यामुळे आपण समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचू शकतो.  पत्रकार हा लोकशाहीतील चौथा खांब आहे. पत्रकारिता हा करीयर साठी उत्तम पर्याय आहे,असे प्रतिपादन दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते महाविद्यालयामध्ये आयोजित "ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद"याअभ्यासक्रमा च्या  उद्घाटनाचे व गेल्या वर्षी ज्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुणपत्रक देतानाच्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलताना चे.

यावेळी यावर्षी या अभ्यासक्र मासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला त्यांना प्रमाणपत्र व  गुणपत्रक देऊन त्यांचा सत्कार केला व करिअरसाठी हा पर्याय निवडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या नॅक कमिटीचे समन्वयक प्रा. आर.बी .चोपडे यांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.यावेळी डॉ.श्रीकृष्ण साळोखे, प्रा.गौतम कांबळे, प्रा.संतोष पाडळकर ,संग्राम भोईटे,बाबासो पोवार तसेच महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले तर स्वागत व प्रास्ताविक अतुल नगरकर यांनी केले .आभार प्रा. डॉ.आनंद वारके यांनी मानले.

दूधसाखर महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद याअभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉक्टर संजय पाटील,विचारमंचावर प्रा.आर.बी. चोपडे, ग्रंथपाल अतुल नगरकर, डॉ.प्रदीप कांबळे, डॉ.आनंद वारके


No comments:

Post a Comment

मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे -प्राचार्य डॉ.संजय पाटील

दूधसाखर महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय पाटील ...