Saturday, December 30, 2023

दूधसाखर मध्ये 31 डिसेंबरच्या पूर्वसंध्येला प्राचार्य डॉ.संजय पाटील यांच्या मार्फत दूध वाटप झाले


बिद्री. पाश्चात्य संस्कृतीच्या आहारी जाऊन आज तरुण पिढी बरबाद होती आहे.31 डिसेंबर च्या नावाखाली, वर्ष पूर्तीच्या निमित्ताने तरुणांनी दारू,अंमली पदार्थांचे सेवन करून आपल्या शरीराची नासाडी करू नये, कुटुंब,समाज,देश,मानवजातीची मानहानी करू नका,त्याऐवजी दूध प्या आणि निरोगी रहा असे अवाहन प्राचार्य डॉ.संजय पाटील यांनी केले.ते प्रतिवर्षाप्रमाणे  दूधसाखर महाविद्यालयात दूधवाटप प्रसंगी बोलत होते.                  डॉ.पाटील पुढे म्हणाले,आपले आरोग्य चांगले असणे हे आपल्यासाठी,कुटुंबासाठी,समाजासाठी,देशासाठी महत्वाचे आहे.निरोगी शरीरात निरोगी मन असते.भारताच्या उज्वल भवितव्यासाठी तरुण सशक्त,निरोगी हवा. या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना ,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी यांना दूध वाटप केले. गेली दहा वर्षे  प्राचार्य डॉ.संजय पाटील यांचेकडून वर्षाच्या अखेरीस दूध वाटप आणि वाईट व्यसनांच्या  आहारी तरुण जाऊ नयेत म्हणून प्रबोधन सुरू आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tuesday, December 26, 2023

मॉरिशस च्या स्वातंत्र्यासाठी महात्मा गांधीजींची प्रेरणा. प्राचार्य डॉ.संजय पाटील

मॉरिशस मध्ये निबंधवाचन करताना प्राचार्य डॉ.संजय पाटील, मराठी विभागप्रमुख डॉ.मधुमती कुंजल , शिविमचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव, डॉ.शिवाजी होडगे व इतर

बिद्री .सत्य ,अहिंसा आणि सत्याग्रह यांची कास धरून महात्मा गांधीजींनी जसे भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले त्याप्रमाणे मॉरिशसला स्वातंत्र्य मिळण्यासाठी महात्मा गांधींची प्रेरणा मिळाली ,असे प्रतिपादन   दूधसाखर महाविद्यालय, बिद्रीचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले. त्यांनी मॉरिशस येथील महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मधील मराठी विभागाने आयोजित केलेल्या "भारत- मॉरिशस आंतरसांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध : कला,साहित्य आणि संस्कृती यावरील प्रभाव" या मुख्य विषयावरील दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय, आंतरशाखीय चर्चासत्रात "महात्मा गांधीजींचे शेतकरी, शेतमजूर व कामगार यांच्यासाठी दक्षिण आफ्रिका, मॉरिशियस, फिजी व भारत या देशात केलेले कार्य" या विषयावरचा शोध निबंध सादर केला  त्यावेळी प्रथम सत्राच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते. मॉरिशस मधील मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ.मधुमती कुंजल या प्रमुख उपस्थित होत्या.  प्राचार्य डॉ.संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रथम सत्रात अकरा शोधनिबंधकारांनी विविध विषयावरचे आपले       शोधनिबंध सादर केले.            प्राचार्य डॉ.पाटील पुढे म्हणाले, भारताप्रमाणे महात्मा गांधीजींनी इंग्रजांच्या गुलामगिरीतून मॉरिशसला मुक्त करण्यासाठी तेथील  शेतकरी ,शेतमजूर व कामगार यांना शिक्षण आणि सत्याग्रह या मार्गांची जाणीव जागृती करून दिली. सन 1901 मध्ये महात्मा गांधी मॉरिशस मध्ये 18 दिवसांसाठी वास्तव्यास होते. त्यावेळी तेथील लोकांची दुर्दशा पाहून गांधीजींनी त्या लोकांना सामाजिक ,आर्थिक आणि राजकीय अधिकारांची जाणीव करून दिली. गांधीजींचे हे सर्वात मोठे योगदान मॉरिशसमध्ये मानले जाते. गांधीजींनी आपले बॅरिस्टर मित्र श्री. मनीलाल ठाकूर यांना मॉरिशसमध्ये पाठवून 'पोर्ट लुईस 'येथून "हिंदुस्तानी" नावाचे वृत्तपत्र काढण्यास सांगितले. या वृत्तपत्रातून इंग्रजी राजवटीच्या अन्यायाच्या बातम्या सर्वसामान्यांना कळू लागल्या. शिक्षण आणि स्वातंत्र्याविषयी जाणीव जागृती झाल्यामुळे मॉरिशस मधील सर्वसामान्य लोकांनी इंग्रजांच्या राजवटीतून मुक्त होण्यासाठी जनआंदोलने, चळवळी उभारल्या. यातून रामगुलामन नावाचा एक भारतीय कामगार हा मॉरिशसचा नेता म्हणून उदयास आला. तेहतीस वर्षांच्या स्वातंत्र्यलढ्यानंतर 12 मार्च 1968 रोजी मॉरिशस इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झाला. त्यावेळी मा.शिवसागर रामगुलामन यांनी मॉरिशसचे पहिले मुख्यमंत्री आणि नंतर पंतप्रधान म्हणून शपथ घेतली .या पाठीमागे महात्मा गांधीजींची प्रेरणा आहे. म्हणून आजही मॉरिशसमध्ये महात्मा गांधीजींना मानाचे स्थान आहे. महात्मा गांधीजींच्या या योगदानाचा इतिहास मॉरिशस आणि जगभरातल्या लोकांना कळावा म्हणून महात्मा गांधी इन्स्टिट्यूट ही संस्था प्रसार आणि प्रचाराचे काम करते आहे ,ही भारतीयांसाठी अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट आहे .                मॉरिशस येथील चर्चासत्राचे नियोजन महात्मा गांधी इन्स्टिट्यूट मोका ,मराठी विभाग मॉरिशस ,शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघ,कोल्हापूर आणि सातारा येथील कला आणि वाणिज्य महाविद्यालयाने आयोजित केले होते. या चर्चासत्राचे उद्घाटन मॉरिशसचे संसद सदस्य आशलेय  इट्ट यांच्या हस्ते झाले .यावेळी इंद्रजीत राय, वाय .मनुबोध, डॉ. आर. अप्पाडू , मराठीविभाग प्रमुख डॉ.मधुमती कुंजल, गांधी इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ.राजकुमार रामप्रताप, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशनचे अध्यक्ष असंत गोविंद,  मराठी भाषा मंडळाचे नितीन बापू,  प्रा.डॉ. बिदन आबा ,शिवाजी विद्यापीठ मराठी शिक्षक संघाचे अध्यक्ष डॉ. भरत जाधव ,डॉ.प्रकाश दुकळे, डॉ. मांतेस हिरेमठ ,डॉ. शिवकुमार सोनाळकर, डॉ.अनिल गवळी, डॉ. शिवाजी होडगे ,भारतातील विविध भागातील मराठी विषयासह विविध विषयांचे 50 प्राध्यापक, मॉरिशस मधील प्राध्यापक, विद्यार्थी विद्यार्थिनी व प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.

मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे -प्राचार्य डॉ.संजय पाटील

दूधसाखर महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय पाटील ...