Wednesday, October 25, 2023

'दूधसाखर'ची प्राची चौगले मराठी विषयात विद्यापीठात प्रथम

दूधसाखर च्या प्राची चौगले हिचा सत्कार करताना संस्था अध्यक्ष मा.के. पी. पाटील सोबत प्राचार्य डॉ. संजय पाटील, डॉ.आनंद वारके, डॉ.प्रदीप कांबळे, प्राचीचे वडील बंडेराव चौगले.

बिद्री : येथील दूधसाखर महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्राची बंडेराव चौगले ही शिवाजी विद्यापीठाच्यावतीने मार्च/एप्रिल २०२३ मध्ये घेतलेल्या परीक्षेत मराठी विषयामध्ये विद्यापीठात गुणानुक्रमे प्रथम आली आहे.तिला विद्यापीठाच्यावतीने प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणारी प्राचार्य एस.के ऊर्फ बापूसाहेब उणूने तसेच डॉ.विष्णू बाळकृष्ण ऊर्फ मधू कुलकर्णी यांचे नावे देण्यात येणारी पारितोषिकेही मिळाली आहेत.तिला संस्थाध्यक्ष मा.के.पी.पाटील,उपाध्यक्ष मा.विठ्ठलराव खोराटे , सर्व संचालक मंडळ , सचिव मा.एस.जी.किल्लेदार यांचे प्रोत्साहन व प्राचार्य डॉ.संजय पाटील,प्रा.डॉ.आनंद वारके व डॉ.प्रदीप कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Saturday, October 21, 2023

दूधसाखर मध्ये मराठी शिक्षक प्रशिक्षण संपन्न

उद्घाटक म्हणून बोलताना ,,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूरच्या  मराठी भाषा अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा.डाॅ.रणधीर शिंदे

 बिद्री :शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर,मराठी भाषा अभ्यास मंडळ,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर,

शिवाजी विद्यापीठ मराठी भाषा शिक्षक संघ,कोल्हापूर व श्री.दूधसाखर शिक्षण प्रसारक मंडळ,बिद्री संचालित दूधसाखर महाविद्यालय,बिद्री यांच्या संयुक्त विद्यमाने बी.ए.भाग २ पे.क्र.४ व ६ या अभ्यासपत्रिका शिकविणाऱ्या मराठी भाषा शिक्षकांचे प्रशिक्षण येथील दूधसाखर महाविद्यालयात नुकतेच पार पडले.प्रशिक्षण शनिवार दि.२१.१०.२०२३ रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत झाले.


या प्रशिक्षणातील उद्घाटन सत्र सकाळी १०.०० ते १०.३० या वेळेत झाले.स्वागत व प्रास्ताविक प्रा.डॉ. आनंद वारके यांनी केले.उद्घाटन प्रा.डाॅ.रणधीर शिंदे,अध्यक्ष,मराठी भाषा अभ्यास मंडळ,,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांच्या शुभहस्ते झाले.

यावेळी "कविता व कादंबरीचे अध्यापन"या विषयावर बीजभाषक प्रा.डाॅ.नंदकुमार मोरे,प्रमुख,मराठी भाषा विभाग,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांचे बीजभाषण झाले.

अध्यक्षस्थानी दूधसाखर महाविद्यालय,बिद्रीचे प्राचार्य प्रा.डाॅ.संजय पाटील हे होते.तसेच

श्री.एस.जी.किल्लेदारसो,सचिव,श्री.दूधसाखर शिक्षण प्रसारक मंडळ,बिद्री,प्रा.डाॅ.भरत जाधव,प्रा.डाॅ.प्रकाश दुकळे,सर्व सन्माननीय सदस्य,मराठी भाषा अभ्यास मंडळ,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर,शिवाजी विद्यापीठ

मराठी भाषा शिक्षक संघ,कोल्हापूरचे 

सचिव व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते. आभार प्रा.डॉ.प्रदीप कांबळे यांनी मानले.उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन मराठी भाषा विभाग,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर येथील अभ्यासिका सुस्मिता खुटाळे यांनी  केले.


प्रशिक्षणाचे पहिले सत्र सकाळी १०.३० ते  दुपारी १.०० या वेळेत झाले.या सत्रात  पे.क्र.४ साठी नियुक्त अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण झाले.

"पक्ष्याचे लक्ष थवे,ना.धों.महानोर यांच्या निवडक कविता : अध्यापन व मूल्यमापन"या विषयावर  प्रा.डाॅ.उदय जाधव यांनी व "गीत लेखन:अध्यापन व मूल्यमापन"या विषयावर डाॅ.चंद्रकांत पोतदार यांनी प्रशिक्षण दिले. यावेळी सत्राध्यक्ष म्हणून प्रा.डाॅ.अनिल गवळी, प्रमुख,मराठी भाषा विभाग,यशवंतराव चव्हाण, महाविद्यालय, हलकणी यांनी तर सत्र संयोजक  प्रा.डॉ.प्रियांका कुंभार यांनी काम पाहिले.


दुसऱ्या सत्रात सत्र दुसरे : पे.क्र.६ साठी नियुक्त अभ्यासक्रमवर प्रशिक्षण झाले.या सत्रात 

"'बनगरवाडी' : अध्यापन व मूल्यमापन" या विषयावर ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक प्राचार्य डॉ सयाजीराजे मोकाशी यांनी तर "रिपोर्ताज संकल्पना : अध्यापन व मूल्यमापन"या विषयावर प्रा.डाॅ.शिवाजीराव जाधव, पत्रकारिता विभाग,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांनी प्रशिक्षण दिले.यावेळी सत्राध्यक्ष म्हणून प्रा.डाॅ.शिवाजीराव होडगे,प्रमुख,मराठी भाषा विभाग,सदाशिवराव मंडलिक महविद्यालय,मुरगूड हे उपस्थित होते.या सत्राचे सत्र संयोजक म्हणून प्रा.डाॅ.विजय शिंदे यांनी काम पाहिले.


समारोप सत्रात  प्रा.डाॅ.सुनिल चंदनशिवे, सदस्य,मराठी भाषा अभ्यास मंडळ,शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थिती प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.यावेळी शिवाजी विद्यापीठ मराठी भाषा शिक्षक संघ,कोल्हापूरचे सचिव  प्रा.डाॅ.मांतेश हिरेमठ हे प्रमुख उपस्थित होते.प्रदीप कांबळे यांनी आभार मानले.दरम्यान मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या पुस्तिकेचे संपादक म्हणून प्राचार्य, डॉ.संजय पाटील प्रमुख,मराठी भाषा विभाग यांनी,कार्यकारी संपादक म्हणून प्रा.डॉ.आनंद वारके यांनी व सहसंपादक म्हणून प्रा.डॉ.प्रदीप कांबळे यांनी काम पाहिले. या प्रशिक्षणास कोल्हापूर,सांगली,सातारा जिल्ह्यातून 100 हून अधिक मराठी विषयाचे शिक्षक  आणि प्रा.डॉ.एस. ए.साळोखे,डॉ.सी. वाय.जाधव ,अधीक्षक एस.के .पाटील, डॉ.नामदेव वारके,संजय गुरव,संग्राम भोईटे यांच्यासह सर्व शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.




Saturday, October 14, 2023

पत्रकारिता हा करिअरसाठी उत्तम पर्याय: प्राचार्य डॉ. संजय पाटील

 बिद्री.विद्यार्थ्यांनी पदवी शिक्षण पूर्ण करतानाच  करिअरसाठी उत्तम मार्ग म्हणून पत्रकारिता शिकणे ही आता काळाची गरज झाली आहे. या कलेच्या माध्यमातून आपण आपल्या मनातील भावना विचार व्यक्त करू शकतो आणि समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडू शकतो यामुळे आपण समाजातील सर्व थरांपर्यंत पोहोचू शकतो.  पत्रकार हा लोकशाहीतील चौथा खांब आहे. पत्रकारिता हा करीयर साठी उत्तम पर्याय आहे,असे प्रतिपादन दूधसाखर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते महाविद्यालयामध्ये आयोजित "ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद"याअभ्यासक्रमा च्या  उद्घाटनाचे व गेल्या वर्षी ज्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण त्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व गुणपत्रक देतानाच्या कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलताना चे.

यावेळी यावर्षी या अभ्यासक्र मासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तसेच गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला त्यांना प्रमाणपत्र व  गुणपत्रक देऊन त्यांचा सत्कार केला व करिअरसाठी हा पर्याय निवडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या नॅक कमिटीचे समन्वयक प्रा. आर.बी .चोपडे यांनीही विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले.यावेळी डॉ.श्रीकृष्ण साळोखे, प्रा.गौतम कांबळे, प्रा.संतोष पाडळकर ,संग्राम भोईटे,बाबासो पोवार तसेच महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद अभ्यासक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले तर स्वागत व प्रास्ताविक अतुल नगरकर यांनी केले .आभार प्रा. डॉ.आनंद वारके यांनी मानले.

दूधसाखर महाविद्यालयात ग्रामीण पत्रकारिता आणि जनसंवाद याअभ्यासक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉक्टर संजय पाटील,विचारमंचावर प्रा.आर.बी. चोपडे, ग्रंथपाल अतुल नगरकर, डॉ.प्रदीप कांबळे, डॉ.आनंद वारके


मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे -प्राचार्य डॉ.संजय पाटील

दूधसाखर महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय पाटील ...