बिद्री. समाजातील उपेक्षित लोकांच्या सुखदुःखाची मांडणी करून साहित्यामध्ये वेदना, विद्रोह, नकार ,मानवता आणण्याचे काम महान साहित्यिक अण्णाभाऊ साठे यांनी केले. त्यांचे साहित्य हे अजरामर आणि भारतीय पातळीवर सर्वश्रेष्ठ ठरलेले साहित्य आहे .त्यांच्या या कार्याचा मान म्हणून त्यांना भारतरत्न दिला जावा. तसेच इंग्रजांच्या विरुद्ध सक्षमपणे लेखणीची लढाई देऊन आपल्या मराठा व केसरी या दैनिकांच्या माध्यमातून लोकांना जागृत करणाऱ्या लोकमान्य टिळक यांनी भारतीय स्वातंत्र्यासाठी दिलेले योगदान विसरता येणार नाही. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित केलेल्या लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंती च्या संयुक्त प्रतिमापूजन तसेच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या संकलित साहित्याच्या भितीपत्रकाचे उद्घाटन कार्यक्रमाचे. डॉ.एस. ए.साळोखे यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अशोक हवलदार तसेच महाविद्यालयाचे प्रशासकीय कर्मचारी ,सर्व प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत,प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. आनंद वारके यांनी मानले.
दूधसाखर महाविद्यालयात मराठी विभाग आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती आणि लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवन चरित्राची माहिती देताना प्राचार्य डॉ.संजय पाटील,उपस्थित डॉ.आनंद वारके, डॉ.प्रदीप कांबळे