दूधसाखर महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय पाटील
बिद्री.मराठी भाषा ही जगातील सर्वश्रेष्ठ भाषा आहे .कारण ती फक्त महाराष्ट्रात नाही तर महाराष्ट्र बाहेर अनेक देशामध्ये बोलली जाते. तिच्यामध्ये सर्व समावेशक अशी काही मूलतत्वे आहेत ज्यामुळे ती लोकप्रिय अशी भाषा आहे. मराठी भाषेला खूप मोठी साहित्य परंपरा आहे. ही परंपरा मराठीचे उज्वल असणे सिद्ध करते. मराठी साहित्यातील ज्येष्ठ लेखक कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. कारण त्यांनी मराठी साहित्यात उत्तम असे साहित्य लेखन केलेले आहे. त्यांची साहित्य परंपरा मराठी माणसाच्या जगण्याचे समृद्ध चित्र करते. अशा या महामानवाला त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. संजय पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते महाविद्यालयात आयोजित मराठी राजभाषा गौरव दिनाचे. यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक ,प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा .डॉ.प्रदीप कांबळे यांनी केले. तर उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. आनंद वारके यांनी केले. यावेळी विचार मंचावर महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. एम.जी. खानापुरे उपस्थित होते.