Thursday, March 26, 2026

संवेदनशील माणूसच कविता लिहितो:- कवी गोविंद पाटील

बिद्री,संवेदनशील मनाचाच माणूस कविता लिहू शकतो, जो प्रत्येक गोष्टीकडे भावनिक दृष्टीने पाहतो, तो आपल्या भावना अचूकपणे कवितेमध्ये मांडू शकतो, कवितेसाठी व्यवहारापेक्षा विचार महत्त्वाचा असतो. असे मत कोनवडे येथील प्रसिद्ध कवी गोविंद पाटील यांनी व्यक्त केले. निमित्त होते दूधसाखर महाविद्यालयात आयोजित अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत "मराठी काव्य निर्मिती" या विषयावरील कार्यशाळेचे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय पाटील होते. कार्यक्रमाचे उद्घाटन सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवाजीराव होडगे यांनी केले.त्यांनी कवितेच्या मूलभूत तत्वाची चर्चा केली व काव्य निर्मितीची प्रक्रिया समजून सांगितली.
यावेळी दुसरे वक्ते प्रा. शिवाजी देसाई यांनीही आपल्या कविता सादर करून काव्य निर्मितीचे गुपित उलगडून दाखवले. स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. आनंद वारके यांनी केले. आभार प्रा.डॉ. प्रदीप कांबळे यांनी मानले सूत्रसंचालन प्रा. सुहानी पाटील यांनी केले. कार्यक्रमाला अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ.एस.जी.खानापुरे, देवचंद कॉलेजचे प्रा.डॉ. रमेश साळुंखे, कागलचे प्रा.संदीप वाडेकर,मुरगुडचे प्रा.सोहम डाफळे ,ग्रंथपाल अतुल नगरकर,जगन्नाथ कांबळे यांच्यासह  सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संवेदनशील माणूसच कविता लिहितो:- कवी गोविंद पाटील

बिद्री,संवेदनशील मनाचाच माणूस कविता लिहू शकतो, जो प्रत्येक गोष्टीकडे भावनिक दृष्टीने पाहतो, तो आपल्या भावना अचूकपणे कवितेमध्ये मांडू शकतो, क...